|
बेंगळुरू (कर्नाटक) – प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यासारखे घाणेरडे विचार या देशात कुठेही पहायला मिळाले नसतील. कदाचित् त्यांना यात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नाव लिहायचे असेल. महिला भक्तीभावाने भगवान श्रीकृष्णासह रहात होत्या. बहुधा प्रज्ज्वल रेवण्णा यांना श्रीकृष्णाचाही विक्रम मोडीत काढायचा होता, असे संतापजनक विधान कर्नाटकचे उत्पादन शुल्क मंत्री रामप्पा तिम्मापूर यांनी केले. त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. जनता दल (सेक्युलर) पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर सहस्रो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
'Prajwal Revanna seems to have wanted to break Shri Krishna's record too !' – Karnataka #Congress Minister Ramappa Timmapur
Former PM Deve Gowda's grandson Prajwal Revanna is accused of sexually exploiting thousands of women
It should not be a surprise if Hindus teach a lesson… pic.twitter.com/96xBzNz8hL
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2024
तिम्मापूर यांच्या विधानावर भाजपचे नेते मोहन कृष्णा यांनी टीका करतांना म्हटले की, काँग्रेसने जेव्हा तिचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, तेव्हापासून तिची दिवाळखोरी दिसत आहे. आता ती सनातन धर्माची थट्टा करू लागली आहे. काँग्रेस आणि हिंदु धर्म हे एकत्र येऊ शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. रामप्पा तिम्मापूर यांचे विधान अतिशय लाजिरवाणे असून हिंदु धर्मातील देवतांचा अवमान केल्यामुळे त्यांना मंत्रीमंडळातून तात्काळ हटवले पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो.
‘इस्कॉन’चे उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले की, हल्ली सनातन धर्माचा अवमान करणे ही ‘फॅशन’च झाली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांनीही केले होते आक्षेपार्ह विधान !
काँग्रेसचे मंत्रीच नाही, तर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ३ दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा लोकसभा मतदारसंघातील प्रचार सभेत बोलतांना म्हटले होते की, आमचे उमेदवार शिव कुमार दहारिया यांच्या नावातच शिव आहे. त्यामुळे ते रामाचा (भाजपच्या राजकारणाचा) चांगलाच सामना करतील.
संपादकीय भूमिका
|