अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामनाथी आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरातील रामशिळेचे दर्शन घेतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

‘पौष शुक्ल पक्ष द्वादशी (२२.१.२०२४) या दिवशी अयोध्येतील नूतन मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्यानंतर मी रामनाथी आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरापासून काही अंतरावर उभी राहून मंदिरातील रामशिळेला (सुवर्णरेषा असलेल्या ‘श्रीराम’ शाळिग्रामाला) नमस्कार केला. त्या वेळी मला माझ्या बाजूला प्रकाश दिसला आणि ‘श्रीरामाचे तत्त्व त्या रामशिळेत प्रकट झाले आहे’, मला जाणवले. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ‘रामशिळेमध्ये काय पालट जाणवतो ?’ हे पहाण्यासाठी मी मंदिराच्या जवळ जाऊन रामशिळा पाहिली. तेव्हा मला पुढील पालट झाल्याचे जाणवले.

‘श्रीराम शाळिग्रामा’ची पालखी (गोलात शाळिग्राम मोठा करून दाखवला आहे.)

१. रामशिळा प्रकाशमान झाली होती.

अश्विनी कुलकर्णी

२. रामशिळेवरील ब्रह्मनाडीचा (टीप) सोनेरी रंग नेहमीच्या तुलनेत गडद झालेला दिसला.

३. मला रामशिळेवर नेहमी हनुमानाचा आकार दिसतो. मला त्या हनुमानाच्या आकाराच्या बाजूला श्रीरामाचे मुख दिसून ‘श्रीरामाने हनुमानाला छातीशी धरले आहे’, असे जाणवले.

(टीप – श्रीराम शाळिग्रामावर (रामशिळेवर) एक सुवर्णरेषा असून ती साक्षात् श्रीविष्णूची रेषा आहे. ती ‘ब्रह्मनाडी’ असल्याचे महर्षींनी म्हटले आहे.)

हे पाहून माझ्या अंत:करणात श्रीरामस्वरूप गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव दाटून आला.

‘हे प्रभु श्रीरामा, तुझ्या या प्रकटतत्त्वाचा आम्हा सर्व साधकांना आमच्या साधनेसाठी लाभ करून घेता येऊ दे’, अशी तुझ्या सुकोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– अश्विनी अनंत कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा. (१.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक