Myanmar Rohingyas : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या संघटनेने १ सहस्र ६०० हिंदूंना ठेवले ओलीस !

या संघटनेला आहे म्यानमारच्या सैन्याचे समर्थन

अराकान आर्मी

यांगून (म्यानमार) – रोहिंग्या मुसलमानांनी वर्ष २०१७ मध्ये म्यानमारच्या राखीन  राज्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू आणि बौद्ध यांची हत्या केली होती. आता अराकान प्रांतातील बुथिदुआंग येथे १ सहस्र ६०० हून अधिक हिंदू आणि १२० बौद्ध धर्मियांना रोहिंग्या मुसलमानांच्या सशस्त्र संघटनेने ओलीस ठेवल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्सप्रेम’ने प्रसारित केले आहे. विशेष म्हणजे हे काम करणार्‍यांना मान्यमारच्या सैन्याचा पाठिंबा असल्याचे म्हटले जात आहे.

म्यानमारच्या सैन्याने धर्मांध मुसलमानांना स्थानिक समुदायांमध्ये दहशत पसरवण्याचे काम दिले आहे. म्यानमारचे सैन्य नोव्हेंबर २०२३ पासून ‘अराकान आर्मी’विरुद्ध लढत आहे. म्यानमार सैन्याने ‘अराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी’ आणि ‘अराकान रोहिंग्या आर्मी’ यांना ‘अराकान आर्मी’विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे अन् सैनिकी प्रशिक्षण दिले आहे. रोहिंग्या आतंकवादी केवळ घरेच लुटत नव्हे, तर लोकांचे अपहरण करून त्यांची घरेही जाळत आहेत.

संपादकीय भूमिका

भारत सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी म्यानमार सरकारकडे आवाज उठवला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !