इंग्रजी माध्यम आश्रमशाळा बांधकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे वितरण !

प्रतिकात्मक छायाचित्रं

पुणे – आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग आणि अल्पसंख्यांक यांच्या कल्याणावरील उपयोजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांचे बांधकाम या योजनेसाठी वित्त विभागाने मान्यता दिली आहे. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या आश्रमशाळांच्या बांधकामासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरीत केलेला आहे. या निधीचा योग्यरित्या खर्च होत आहे ना ? याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

निधी दिलेल्या कामासाठीच खर्च होईल या विषयीचे सर्वस्वी दायित्व संबंधित नियंत्रक अधिकारी आणि अधीक्षक अभियंता यांची रहाणार आहे. अधीक्षक अभियंता बांधकामांना वेळोवेळी भेट देऊन कामाचा दर्जा, गुणवत्ता यांची पडताळणी करणार आहेत. वितरीत निधीमधून झालेल्या खर्चाचा अहवाल एकत्रित करून नियंत्रक अधिकारी तो शासनास सादर करणार आहेत.