पुणे – पुण्यात कुरकुंभ एम्.आय.डी.सी.मध्ये सिद्ध करण्यात आलेला एम्.डी. नावाचा अमली पदार्थ लंडन येथे पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. कुरियरच्या माध्यमातून हे पदार्थ पाठवण्यात आले. त्वरित खाऊ शकतो, अशा अन्नपदार्थांच्या (रेडी टू इट फूड) पाकिटांच्या माध्यमातून एम्.डी. अमली पदार्थ लंडनमध्ये पोचवण्यात आले आहेत. देहलीतून लंडनमध्ये ४ पार्सल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या ३ जणांवर लंडनला अमली पदार्थ पाठवण्याचे दायित्व होते. यांपैकी भुटीया आणि कुमार हे दोघेही ‘फूड कुरिअर’चा व्यवसाय करत होते.
संपादकीय भूमिकायातून अमली पदार्थ सिद्ध करणार्यांची यंत्रणा किती दूरवर पसरली आहे, हे लक्षात येते. हे जाळे नष्ट करण्यासाठी पोलीस कठोर पावले केव्हा उचलणार ? |