पोलिसी गणवेशात ‘इंस्टाग्राम’वर रिल्स बनवणारे २ पोलीस निलंबित ! 

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – येथे पोलिसी गणवेशात ‘इंस्टाग्राम’वर रिल्स बनवणार्‍या २ रेल्वे पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यात एका महिला पोलिसाचाही समावेश आहे. ‘गणवेशातील व्यक्तीने शिस्तीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे’, असे अधिकार्‍याने स्पष्ट केले.

वसई रेल्वे पोलीस ठाण्यात दोन पोलिसांनी शिकवणी केंद्र (कोचिंग सेंटर) चालवल्याप्रकरणी त्यांचेही निलंबन करण्यात आले. यात एका पोलीस अधिकार्‍याचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

कर्तव्यचुकारपणा करणार्‍या पोलिसांना निलंबित नव्हे, तर बडतर्फच करायला हवे !