बरेली (उत्तरप्रदेश) येथील वनखंडी नाथ मंदिराजवळ धर्मांधांकडून कावड यात्रेकरूंवर दगडफेक

(प्रतिकात्मक चित्र)

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील वनखंडी नाथ मंदिराजवळील एका ठिकाणी ५० ते ६० धर्मांधांनी  कावड यात्रेकरूंवर दगडफेक केल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या घटनेनंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे कावड यात्रेकरूंमध्ये संताप आहे.

वनखंडी नाथ मंदिर हे प्रमुख नाथ मंदिरांपैकी एक आहे. येथे मोठ्या संख्येने सोमवारच्या दिवशी कावड यात्रेकरू हरिद्वार येथून कावडद्वारे गंगाजल घेऊन अभिषेक करतात. त्यासाठीच कावड यात्रेकरू येथे जात असतांना ही घटना घडली.

संपादकीय भूमिका 

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांना अशा प्रकारचे आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते !