लॉर्ड मेकॉले याने वडिलांना लिहिलेल्या पत्रातील भाष्य
‘आमच्या इंग्रजी (माध्यमाच्या) शाळांची वाढ झपाट्याने होत आहे. सर्व इच्छुकांपर्यंत हे शिक्षण पोचवणे आम्हाला अवघड आणि काही ठिकाणी अशक्य होत आहे. हुगळी (बंगाल) या एका शहरातच १ सहस्र ४०० मुले इंग्रजी शिकत आहेत. या शिक्षणाचा हिंदूंवर विलक्षण परिणाम होत आहे. इंग्रजी शिक्षण घेणार्या एकाही हिंदूचे त्याच्या धर्माशी कधी प्रामाणिक नाते उरत नाही. काही (हिंदू) केवळ चालीरीतींमुळे धर्माचे पालन करत रहातात; पण बरेचसे स्वतःला फक्त आस्तिक (ईश्वरवादी) म्हणवतात आणि काही ख्रिस्ती होतात. माझा दृढविश्वास आहे की, शिक्षणाची आमची योजना जर अशीच चालू राहिली, तर आजपासून ३० वर्षांनी बंगालमधील प्रतिष्ठित वर्गात एकही मूर्तीपूजक उरणार नाही आणि हे सगळे धर्मांतराचे कष्ट न घेता, धर्मस्वातंत्र्यात काही ढवळाढवळ न करता, ज्ञान अन् चिंतन यांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून साध्य होईल. या आशेने मला मनापासून आनंद होतो.’ (‘द लाईफ अँड लेटर्स ऑफ लॉर्ड मेकॉले’ या पुस्तकातील पृष्ठ ३९९ वरील उतारा)
(साभार : श्री. रोहित सहस्रबुद्धे यांच्या फेसबुकवरून, १९.७.२०२३)