न्यूयॉर्क (अमेरिका) – स्विडनमध्ये वारंवार कुराण जाळण्याच्या घटनांविरोधात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये पाकिस्तानकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला भारताने समर्थन दिले. या प्रस्तावात पाकिस्तानने कुराण जाळणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वेळी अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, रोमानिया, लिथुआनिया, कोस्टा रिका, फिनलंड, युरोपीयन युनियनसह अनेक पाश्चात्त्य देशांनी भाषण स्वातंत्र्याचा संदर्भ देत प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.
#भारत ने #UN में #पाकिस्तान के प्रस्ताव का किया समर्थन, स्वीडन में कुरान जलाने का मामला #India #Pakistan #Sweden https://t.co/Ray202tKfR
— AajTak (@aajtak) July 13, 2023
मानवाधिकार परिषदेमध्ये एकूण ४७ सदस्य आहेत. यांमध्ये इस्लामी देशांची ंसंघटना असलेल्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’शी संबंधित केवळ १९ देश समाविष्ट आहेत. या सर्वांनी पाकिस्तानच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. चीननेही पाकिस्तानच्या समर्थनार्थ मतदान केले. त्याचबरोबर नेपाळसह ७ देशांनी मतदान केले नाही.
संपादकीय भूमिकापाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांमध्ये सातत्याने हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर होत असलेली आक्रमणे, हिंदूंवरील अत्याचार आदींच्या विरोधात भारत संयुक्त राष्ट्रांत प्रस्ताव का सादर करत नाही ? |