मुंबई – गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये युवतीवर बलात्कार करणार्या रिक्शाचालकाला पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून ९ जुलै या दिवशी अटक केली. इंद्रजीत सिंह (वय २० वर्षे) असे या रिक्शाचालकाचे नाव आहे. युवतीवर बलात्कार करून इंद्रजीत याने तिला मारहाण केली. पोलिसांनी त्याची रिक्शा कह्यात घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच ही बलात्काराची घटना घडली होती. पोलिसांनी तत्परतेने अन्वेषण करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
संपादकीय भूमिकामहिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेऊन स्वत:च्या रक्षणासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! |