राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने प्रशासनाकडे मागितला अहवाल !

ओडिशा येथे ११ अल्पवयीन हिंदु मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशातील जगतसिंहपूरमधील काटेसिंहपूर गावामध्ये कॅनडाचा नागरिक एपेन मोहन किडंगलील याच्याकडून अन्य २ ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या माध्यमांतून ११ अल्पवयीन हिंदु मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आला होता, असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (‘एन्.सी.पी.सी.आर्’ने) यआरोपीवर कारवाई करण्यासाठी जगतसिंहपूर प्रशासनाला पत्र लिहिले आहे. या मुलांच्या संदर्भातील माहिती आयोगाला सादर करावे, असा आदेशही दिला आहे.

विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना धर्मांतराच्या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी किडंगलील याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना २४ जून २०२३ या दिवशी घडली होती. किडंगलील याच्याकडून रोख रक्कम, कागदपत्रे, बायबल आदी साहित्य जप्त करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

एक विदेशी नागरिक भारतात येऊन हिंदूंचे धर्मांतर करतो, तरी गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? याचीही सरकारने चौकशी केली पाहिजे !