सनातन संस्था सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना साहाय्य करणार्‍यांचे आभार !

आभार

१. जामसंडे, देवगड – सनातनच्या कार्याला नियमितपणे आपले कार्यालय उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात योगदान देणारे ‘श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालया’चे मालक श्री. श्रीरंग दत्तात्रय पाटणकर, कार्यक्रमाच्या प्रसारासाठी रिक्शा अल्पदरात उपलब्ध करून देणारे श्री. सुभाष तुकाराम भुजबळ आणि ‘प्रोजेक्टर’ देणारे डॉ. रामदास बोरकर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

२. कणकवली – मातोश्री मंगल कार्यालयाचे मालक श्री. दत्ताराम कराळे, ध्वनिक्षेपक यंत्रणा देणारे तरंदळे येथील श्री. नरेश घाडीगावकर आणि कणकवली येथील श्री. विश्वनाथ चव्हाण, ‘प्रोजेक्टर’ देणारे श्री. गणेश नार्वेकर यांचे आभार व्यक्त करण्यात आला.

प.पू. घडशी महाराज यांचा सन्मान करतांना रानबांबुळी ओरोस येथील सनातनचे साधक श्री. सुरेश दाभोलकर

३. कुडाळ – कार्यक्रमासाठी अल्पमुल्यात कार्यालय उपलब्ध करून देणारे सिद्धीविनायक मंगल कार्यालयाचे मालक श्री. अरुण पेडणेकर, तसेच अल्पमुल्यात विद्युत जनित्र उपलब्ध करून देणारे श्री. आनंद सामंत आणि विनामुल्य अल्पाहाराची व्यवस्था करणारे धर्मप्रेमी यांचे या वेळी आभार मानण्यात आले.

साधकांनो, कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली, तरी गुरुचरण सोडणार नाही, असा दृढनिश्चय करा !

कुडाळ येथे ३ जुलै या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात मुळदे येथील संत प.पू. घडशी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या गुरुपौर्णिमेनिमित्त प.पू. घडशी महाराज यांनी दिलेला संदेश येथे येत आहोत.

मुळदे, कुडाळ येथील संत प.पू. घडशी महाराज

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनरूपी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दूरदृष्टीने आगामी भीषण काळ ओळखून त्यातून वाचण्यासाठी सर्वांना साधनेचा मार्ग दाखवला आहे. आगामी काळात आध्यात्मिक संरक्षककवच असल्याविना सुरक्षित जीवन जगता येणार नाही; म्हणूनच संकटकाळात केवळ भगवंताला शरण जावे लागेल.

भगवंताचे अवतारकार्य आरंभ झाले आहे. ते समजून घेण्यासाठी साधनेची आणि भक्तीची जोड असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सनातन संस्थेने साधनेचा आणि भक्तीचा मार्ग जगताला दाखवला आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी आता आगामी वाटचाल करायची आहे. साधकांनी, ‘कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली, तरी गुरुचरण सोडणार नाही’, असा दृढनिश्चय केला पाहिजे आणि हा दृढनिश्चयच साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सोडवून मोक्षाचा मार्ग दाखवणार आहे. यासाठी सर्वांमध्ये भाव, भक्ती निर्माण होवो अन् सर्वांना गुरूंचे कृपाशीर्वाद लाभो, ही गुरुचरणी प्रार्थना !’

– प.पू. घडशी महाराज, नवनाथ श्रद्धास्थान, मुळदे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.

उत्पादन कक्षावर उजवीकडून सर्वश्री दीपक पाटकर – माजी नगरसेवक, देवदत्त सामंत – प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजप, सुदेश आचरेकर – माजी नगरसेवक, आबा हडकर आणि प्रमोद करलकर

४. मालवण – मालवण नगरपरिषदेने अल्प मोबदल्यात सभागृह उपलब्ध करून दिले, तसेच कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. ‘काळबादेवी डेकोरेर्टर’चे मालक श्री. बाबू धुरी यांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा विनामूल्य दिली, मालवण पोलिसांनी अनुमती दिली, ‘बांबु हॉटेल’चे मालक संजय गावडे, ‘स्वामी हॉटेल’चे मालक ऋषीकेश पेणकर यांनी भोजन व्यवस्था केली. ‘जय अंबे’ बेकरी आणि श्री. तातोबा करलकर यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. ‘चव्हाण कॅश्यू फॅक्टरी’ यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. या सर्वांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले.

मालवण येथील महोत्सवास सर्वश्री दीपक पाटकर (माजी नगरसेवक), देवदत्त उपाख्य दत्ता सामंत (प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजप), सुदेश आचरेकर (माजी नगरसेवक), आबा हडकर, प्रमोद करलकर, ललित चव्हाण (शहर अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा), मंदार लुडबे (तालुका उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा) आणि विश्व हिंदु परिषदेचे भाऊ सामंत यांची उपस्थिती लाभली होती.

या वेळी सर्व मान्यवरांनी येथे लावलेल्या प्रदर्शनातील विविध कक्षांना भेटी दिल्या आणि सनातनच्या कार्याची माहिती घेतली. याविषयी बोलताना श्री. दत्ता सामंत म्हणाले, ‘‘शहरात सनातनच्या उत्पादनांचा ‘स्टॉल’ कायमस्वरुपी असायला हवा.’’ श्री. आबा हडकर यांनी, ‘प.पू. गुरुदेवांचे लिखाण उच्च दर्जाचे असते’, अशा शब्दांत गुरुदेवांप्रती आदर व्यक्त केला.

५. वेंगुर्ला – कार्यक्रमासाठी कार्यालय उपलब्ध करून धर्मकार्यात योगदान देणारे ‘साई दरबार’ सभागृहाचे मालक श्री. अमरीश मांजरेकर, तसेच कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्वश्री सुनील ठाकूर आणि बाळा शिरसाट यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

६. आरवली – साळगावकर मंगल कार्यालयाचे मालक श्री. चंद्रकांत साळगावकर, प्रसारासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून देणारे श्री. ज्ञानेश्वर पडवळ आणि श्री. विवेक वेरणेकर, ‘प्रोजेक्टर’ उपलब्ध करून देणारे श्री. अशोक नाईक यांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.

७. मळगाव – खानोलकर मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक श्री. सुधीर भागवत, ‘प्रोजेक्टर’ देणारे माठेवाडा, सावंतवाडी येथील श्री. दीपक सावंत यांचे या वेळी आभार मानण्यात आले.

डेगवे येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला प.पू. दास महाराज आणि पू. सौ. लक्ष्मी (माई) नाईक यांची वंदनीय उपस्थिती

८. डेगवे – श्री महालक्ष्मी-़स्थापेश्वर देवस्थान समिती, डेगवे यांनी कार्यक्रमासाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. डिंगणे येथील श्री. प्रदीप सावंत, तसेच डेगवे येथील सर्वश्री मयूर देसाई आणि प्रसाद देसाई, बांदा येथील ‘वीरा ट्रेडर्स’ आणि श्री. विवेक विरनोडकर यांनी सभागृह उभारणीचे साहित्य विनामूल्य दिले. बांदा येथील श्री. सुभाष शिरोडकर आणि शेर्ले येथील श्री. मिलिंद महाजन यांनी ध्वनीक्षेपक यंत्रणेचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. बांदा येथील हॉटेल समर्थचे मालक श्री. साईराज पावसकर आणि ‘मे. कल्पना ट्रेडर्स’चे सर्वश्री किर्ती पटेल आणि सतीश पटेल, तसेच श्री. गौरेश सावंत आणि श्री. अमेय पावसकर यांनी अल्पोपहार आणि भोजन विनामूल्य दिले. या सर्वांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले.

९. झरेबांबर – कार्यक्रमासाठी कार्यालय उपलब्ध करून देणारे आशीर्वाद मंगल कार्यालयाचे श्री. विलास सावंत आणि श्री. उदय सावंत, कार्यक्रमाच्या प्रसारासाठी चारचाकी अल्पदरात उपलब्ध करून देणारे श्री. निश्चल परमेकर (बजरंग दल) आणि श्री. लक्ष्मण सावंत, सरगवे (पुर्नवसन) येथील दैनिक ‘सनातन प्रभातचे’ वाचक अन् ‘प्रोजेक्टर’ उपलब्ध करून देणारे श्री. राजेंद्र पाटील यांचे या वेळी आभार व्यक्त करण्यात आले.

विशेष उपस्थिती

जामसंडे, देवगड – येथे नगरसेवक श्री. विशाल विकास मांजरेकर, प्रतिष्ठित श्री. प्रशांत दत्ताराम हडकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश गोरे आणि सौ. स्वाती गोरे उपस्थित होते.

आरवली – येथे झालेल्या कार्यक्रमाला श्रीमती सुलोचना कुबल (वय ८२ वर्षे) या अस्थिभंग असूनही १० किलोमीटर प्रवास करून आरोंदा येथून आल्या होत्या. संपूर्ण कार्यक्रम मन लाऊन ऐकला आणि आश्रमासाठी खाऊ दिला. सातार्डा गावचे माजी सरपंच भरत मयेकर, आरवलीच्या माजी सरपंच सौ. साधना डोंगरे यांची उपस्थिती होती.

कुडाळ – वैद्य सुविनय दामले, कुडाळ येथील उद्योजक श्री. सतिश डिंगे-सामंत, ओरोस येथील श्री रवळनाथ मंदिर देवस्थानचे मानकरी श्री. यशवंत परब; बोर्डवे, कसाल येथील धर्मप्रेमी श्री. महेश मोडक हे सपत्निक उपस्थित होते.

वेंगुर्ला – येथील पोलीस ठाण्याचे पोलीस परशुराम सावंत कार्यक्रमाला काहीवेळ उपस्थित होते. शिवसेनेचे (ठाकरे गट) वेंगुर्ला शहर प्रमुख अजित राऊळ, वायंगणीचे माजी सरपंच श्री. सुमन कामत, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अजित राऊळ आणि श्री. भाऊ केरकर, भाजपचे पदाधिकारी श्री. रवी शिरसाट हे उपस्थित होते.

कुडाळ येथील कार्यक्रमाला विशेष शाखेतील पोलीस उपस्थित

कुडाळ येथील कार्यस्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील एक पोलीस उपस्थित होते. त्यांनी एका साधकाशी चर्चा केली. या वेळी पोलीस कर्मचार्‍याने संस्थेची धेय्य-धोरणे असतील, त्याप्रमाणे तुम्ही सरकारकडे निवेदन द्यायला हवे, असे सांगितले. त्यावर साधकाने ‘आम्ही नेहमीच आमची मागणी निवेदनाद्वारे सरकारकडे पाठवतच असतो’, असे सांगितले. त्यावर पोलीस कर्मचार्‍याने सांगितले की, ‘जिल्हा अधीक्षक कार्यालयातच असतो मी असताे. तुम्ही माझ्याकडेही निवेदन देवू शकता. मी स्वतः वारकरी संप्रदयाचा आहे.’ त्यांनी स्वतःचा भ्रमणभाष क्रमांक आणि नाव देऊन साधकाचाही संपर्क क्रमांक स्वतःकडे घेतला.

मालवण येथे गुरुपौर्णिमा महोत्सव संपल्यावर रात्री मामा वरेरकर नाट्यगृह (सभागृह) बंद करण्यासाठी मालवण नगरपालिकेचे कर्मचारी श्री. सुभाष कुमटेकर आले होते. तेव्हा ते साधकांना म्हणाले, ‘‘तुम्ही धूप दाखवता आणि कडुलिंबाची धुमी करता तेव्हा सभागृहाचे वातावरण पालटून जाते. खूप प्रसन्न वाटते. प्रत्येक ६ मासांनी तुमचा कार्यक्रम इथे व्हायला हवा.’’

गुणवंत साधक विद्यार्थ्यांचा सत्कार

कु. पावनी चिऊलकर हिचा सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते सत्कार करतांना
कु. मंकरंद तिरवीर याचा सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते सत्कार करतांना
कु. शार्दूल चव्हाण याचा सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते सत्कार करतांना

कुडाळ – प्रासंगिक सेवा करणारे आणि इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवणारी कु. पावनी चिऊलकर आणि ८८ टक्के गुण मिळवणारा कु. मंकरंद तिरवीर, तसेच नियमित सेवा करून इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवून सुयश मिळवणारा कु. शार्दूल चव्हाण या गुणवंत साधक विद्यार्थ्यांचा कुडाळ येथे सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डेगवे – येथील कार्यक्रमात इयत्ता १२ वीमध्ये ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला साधक विद्यार्थी कु. मयूर प्रकाश कविटकर याचा सत्कार करण्यात आला.

मळगाव – येथील कार्यक्रमात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली हरकुळ खुर्द (कणकवली) येथील साधिका कु. प्रतीक्षा परब हिचा सत्कार करण्यात आला.