विविध कलांमध्‍ये प्रवीण असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना अध्‍यात्‍म आणि कला एकमेकांशी जोडून त्‍यातून साधना कशी करायची ? हे शिकवणारे महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय !

‘३१.३.२०२३ या दिवशी मला हुब्‍बळी येथील भरतनाट्यम् नृत्‍यांगना डॉ. सहना भट यांच्‍या रेडिओवरील एका वार्तालापात ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संदर्भातील विषय’ आणि ठाणे येथील शास्‍त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांच्‍या ‘संगीत शिकवणीवर्गातील विद्यार्थ्‍यांसाठी साधना’ या विषयांवरील प्रवचन यांविषयी समजले.

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

तेव्‍हा मनामध्‍ये पुढील विचार आले, ‘संगीत वर्गामध्‍ये किंवा रेडिओवरील वार्तालापाच्‍या माध्‍यमातून बर्‍याच लोकांपर्यंत महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन कार्याविषयीचा विषय गेला आहे. पुढे विविध गुरुकुले, इन्‍स्‍टिट्यूट, अ‍ॅकॅडमी यांमध्‍येही हा विषय अशाच प्रकारे पोचेल आणि हा विषय समजल्‍यावर त्‍यांच्‍यापैकी जे जिज्ञासू असतील, त्‍यांना या विषयाचे महत्त्व लक्षात येईल अन् ‘आपण जे कार्य, साधना करत आहोत, ते शिकण्‍यासाठी’ विविध गुरुकुलांमधील विद्यार्थी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात येतील. म्‍हणजे प्रत्‍यक्षात पुष्‍कळ सारे विद्यार्थी जे संगीत (नृत्‍य, गायन, वादन) शिकलेले आहेत, ते त्‍या कलेत तयार झालेले आपल्‍याकडे येतील. त्‍यांना केवळ ‘कला आणि अध्‍यात्‍म यांच्‍याशी कसे जोडायचे ?’, हा सूक्ष्मातील भाग शिकवायचा आहे किंवा साधना काय आहे, हे सांगायचे आहे’, असे वाटले. म्‍हणजे आता परात्‍पर गुरुदेव आमच्‍याकडून जो साधनेचा पाया पक्‍का करून घेत आहेत, त्‍याचा लाभ पुढे कसा होईल, ते मला दृश्‍य आणि विचार स्‍वरूपांमध्‍ये दिसले. या वेळी परात्‍पर गुरुदेवांनी वेळोवेळी केलेल्‍या, ‘शिकत रहाणे, शिकणे ही अनंताची प्रक्रिया आहे. आपले सगळे आयुष्‍य शिकण्‍यासाठी दिले, तरी अल्‍पच आहे. आताच्‍या आयुष्‍यात साधनेच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक तेवढे शिकले कि झाले. साधनेचा पाया असेल, साधना असेल, तर त्‍या विषयीचे ज्ञान भगवंत देतोच. त्‍यासाठी वेगळे प्रयत्न करण्‍याची आवश्‍यकता नाही’, या मार्गदर्शनाचा उलगडा झाला.

कलेकडे साधनेच्‍या अशा या विभिन्‍न दृष्‍टीकोनातून पाहून कलाकारांना साधनेकडे वळवणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी कृतज्ञतापूर्वक कोटीशः वंदन !

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर (नृत्‍य अभ्‍यासक), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा.