जळगाव – रस्त्यावर तलवारीद्वारे केक कापून वाढदिवस साजरा करणार्या चोपडा (जिल्हा जळगाव) येथील ७ धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. जिल्हाधिकार्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोपडा शहरातील मास्टर वसाहत भागात २३ जूनच्या रात्री ८.३० वाजता सार्वजनिक जागेत सय्यद फैजलअली मझहरअली, शाकीर सय्यद साबीरअली, दानिश सय्यद साबीरअली, रिजवानअली अयाजअली, दानिश शेख हमीद शेख, बाबू लोहार, निजाम लोहार, साजीद शेख गफ्फार, शोएब शाह जाकीर शाह हे केक कापण्यासाठी विनापरवाना धारदार लोखंडी तलवार, तसेच चाकू यांचा वापर करतांना आढळले. रस्त्यावर तलवार आणून केक कापला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ७ संशयितांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली तलवार शोएब शाह जाकीर शाह याच्या घरात आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली.