मुंबई पोलिसांच्‍या खात्‍यातून ३२ लाख गायब !

बँक कर्मचार्‍याला अटक

मुलुंड – मुलुंडच्‍या नवघर पोलिसांनी वर्ष २००३ मध्‍ये एका गुन्‍ह्यात हस्‍तगत करण्‍यात आलेली सुमारे १७ लाख रुपयांची रोख रक्‍कम तत्‍कालीन वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक एल्.पी. खरपडे यांच्‍या नावाने बँकेत खाते चालू करून त्‍यामध्‍ये जमा केली. खरपडे निवृत्त झाल्‍यानंतर कुणीच या खात्‍याकडे लक्ष दिले नाही; मात्र सध्‍या वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक असलेल्‍या दत्ताराम गिरप यांनी हे खाते वर्ग करण्‍याविषयी बँकेकडे विचारणा केल्‍यावर खात्‍यामधील ३२ लाख रुपयांपैकी केवळ  ३२ रुपये शिल्लक असल्‍याचे आढळले. पैसे गेले कुठे ?, हे बँकेच्‍या अधिकार्‍यांसह पोलिसांनी पडताळल्‍यावर एल्.पी. खरपडे या नावाने एका व्‍यक्‍तीने आधारकार्ड, पॅन कार्ड, तसेच केवायसीसाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे सादर करून या बँक खात्‍याचा व्‍यवहार स्‍वतःकडे ठेवल्‍याचे दिसून आले. याविषयी सखोल चौकशी करून पोलिसांनी बँक कर्मचार्‍याला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांच्‍या खात्‍यातून लाखो रुपये गायब करणार्‍या गुन्‍हेगारांना पोलिसांचे भय नसणे, हे गंभीर !