पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी यांना दिल्या १० भेटवस्तू !

वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांची भेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी जो बायडेन यांना चंदनाच्या लाकडापासून बनलेली पेटी, तर जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरा भेट म्हणून दिला. बायडेन यांना दिलेल्या चंदनाच्या पेटीत चांदीच्या १० छोट्या डब्या आहेत. यामध्ये १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

यामध्ये पंजाबमधील तूप, राजस्थानमधील २४ कॅरेट हॉलमार्कचा शिक्का असलेले सोन्याचे नाणे, ९९.४ कॅरेट चांदीचे नाणे, महाराष्ट्राचा गूळ, उत्तराखंडचा तांदूळ, तमिळनाडूतील तीळ, भूदानाचे प्रतीक म्हणून कर्नाटकातील चंदनाचा तुकडा, गोदानाचे प्रतीक म्हणून बंगालमधील कारागिरांनी घडवलेला चांदीचा नारळ आणि गुजरातमधील मीठ यांचा समावेश आहे.