पाकिस्तान कराची बंदर पुढील ५० वर्षांसाठी संयुक्त अरब अमिरातला देण्याची शक्यता 

इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरातील बंदरावर पुढील ५० वर्षांसाठी संयुक्त अरब अमिरातचे नियंत्रण असणार आहे. पाकला कर्ज देण्याच्या बदल्यात हे बंदर संयुक्त अरब अमिरातला देण्यात येणार आहे. लवकरच याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तान हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.