|
(मजार म्हणजे मुसलमानाचे थडगे)
डेहराडून (उत्तराखंड) – हरिद्वार येथे बहादराबाद शहरात सरकारी भूमीवर बांधण्यात आलेली मजार प्रशासनाने बुलडोझरचा वापर करून पाडली. ही माहिती मिळताच धर्मांध मुसलमान तेथे जमले आणि ते प्रशासकीय अधिकार्यांना याविषयी जाब विचारू लागले. त्या वेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
संस्कृत विश्वविद्यालय के पास सरकारी जमीन पर अवैध मजार, ध्वस्त करने पहुँची पुलिस पर भीड़ का हमला: इधर लाठीचार्ज उधर बुलडोजरों ने कर दिया काम#Haridwar #Mazaarhttps://t.co/KhW34kq4Kd
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 13, 2023
१. बहादराबाद शहरात असलेल्या संस्कृत विश्वविद्यालयाच्या जवळ असलेल्या सरकारी भूमीवर धर्मांधांनी अवैध मजार बांधली आणि त्याचे ‘सैय्यद बाबा रोशन अली शाह मजार’ असे नामकरण केले. ‘या मजारीचे मशिदीत रूपांतर करण्यात येणार होते’, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
२. मागील मासात या विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष सागर खेमरिया याने जिल्हाधिकार्यांना पत्र लिहून ‘मजारीत लावण्यात आलेल्या ध्वनीक्षेपकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अडचण येत आहे’, अशी तक्रार केली होती. (अशी तक्रार का करावी लागते ? पोलीस स्वतःहून यावर कारवाई का करत नाहीत ? – संपादक)
३. या तक्रारीची नोंद घेऊन प्रशासनाने १२ जून या दिवशी ही मजार पाडण्यासाठी बुलडोझर मागवले. या वेळी पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. या वेळी मोठ्या प्रमाणात धर्मांधाचा जमाव तेथे जमला.
४. या वेळी धर्मांध ‘अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळेही उद्ध्वस्त करा’, अशी मागणी करू लागले. जमाव आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार केला. ‘शहरातील अनेक अवैध बांधकामांवर प्रशासन कारवाई करत आहे’, अशी माहिती प्रशासनाने दिली.
संपादकीय भूमिका
|