सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेल्या ब्रिटनमधील प्रवासाचा संक्षिप्त वृत्तांत !

‘सप्तर्षींनी सांगितले होते, ‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. त्या आधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुदेव पूर्वी ब्रिटनमध्ये जेथे नोकरी करत होते आणि ज्या ठिकाणी निवास करत होते, तेथे जाऊन यावे.’ त्याप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या प्रवासाचे थोडक्यात वर्णन पुढे दिले आहे.

या प्रवासात त्यांच्या समवेत श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), श्री. स्नेहल राऊत (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि ब्रिटन येथील साधक डॉ. मिलिंद खरे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) हेही होते. पुढे या दौर्‍यातील सर्व वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करण्यात येतील.

४.७.१९७१ ते ११.६.१९७८ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ब्रिटन येथे वास्तव्य केले. एरव्ही रुग्णालयाच्या सदनिकेतच निवास करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९७४ मध्ये शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी रहाण्यासाठी बंगला विकत घेतला होता. खालील छायाचित्र क्रमांक १ मधील फियाट गाडी प.पू. डॉक्टरांची होती.


ब्रिटनमधील घराच्या समोर उभे असलेले डॉ. जयंत आठवले ! त्यांची फियाट गाडीही या छायाचित्रात दिसत आहे. (वर्ष १९७४)

खाली दाखवलेल्या छायाचित्रातील या बंगल्यातील ‘अ’ भागातील खोलीत ते स्वतः रहात, तर उर्वरित ‘आ’, ‘इ’ आदी ७ खोल्या त्यांनी ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ (पलंग असलेली खोली भाड्याने देतांना भाडेकरूला निःशुल्क सकाळचा अल्पाहारसुद्धा देणे) या स्वतःच्या व्यवसायांतर्गत भाड्याने दिल्या होत्या. भाडेकरूंना अल्पाहार सकाळी ७ ते ९ या वेळेत दिला जात असे.

लॅनफ्रेचपा ग्रेंज हॉस्पिटलच्या सदनिकेत बसलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (वर्ष १९७४)   
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वास्तव्य केलेल्या वास्तूला भावपूर्ण नमस्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वास्तव्य केलेल्या चैतन्यमय वास्तूचे सध्याचे छायाचित्र ! एवढ्या वर्षांनंतरही ती जशीच्या तशी टिकून आहे !

‘हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ ब्रिटनमध्ये तुम्ही असलेल्या स्थानी गेल्या, तेव्हा वाटले, ‘धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक असलेली नारायणीशक्ती भगवंताने ज्या ठिकाणी ठेवली होती, ती शक्ती तुम्ही श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना मिळवून दिली. सप्तर्षींच्या माध्यमातून घडलेल्या या विष्णुलीला आम्हा सर्व साधकांसाठी अविस्मरणीय आहेत. ‘या विष्णुलीलेमुळे आम्हा सर्व साधकांना तुम्ही रहात असलेल्या स्थानांचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासहित दर्शन घडले’, याबद्दल आम्ही तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’ – श्री. विनायक दयानंद शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (१७.५.२०२३)

लॅनफ्रेच्पा ग्रेंज हॉस्पिटलच्या इमारतीसमोर डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ

 १. सप्तर्षींनी ब्रिटनचा प्रवास करण्यास सांगणे

श्री. विनायक शानभाग

सप्तर्षींनी ऑगस्ट २०२२ मध्ये सप्तर्षि जीवनाडीपट्टीतून सांगितले होते, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एप्रिल २०२३ मधील शेवटच्या आठवड्यात ब्रिटनला जावे अन् तेथे गुरुदेव पूर्वी रहात असलेल्या स्थानांना भेट द्यावी. गुरुदेव हे साक्षात् श्रीविष्णूचे अंशावतार असल्याने पुढील कार्यासाठी आवश्यक असलेली शक्ती गुरुदेवांनी त्या ठिकाणी ठेवलेली असून आता ती शक्ती घेण्याची वेळ आलेली आहे. यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ब्रिटनला जाऊन प्रार्थना करणे आवश्यक आहे.’

सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी २६ ते ३०.४.२०२३, असा ५ दिवसांचा ब्रिटन प्रवास केला अन् १.५.२०२३ या दिवशी त्या भारतात परत आल्या.

२. श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वी ब्रिटनमध्ये ‘संमोहन उपचार’ यावर संशोधन करणे

भगवंताच्या श्रीराम, श्रीकृष्ण आदी अवतारांचे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी आगमन झाले, ते ते स्थान पुढे भक्तांसाठी पवित्र स्थान झाले. भगवंताची आठवण करून देणारी ही स्थाने आज भारतभूमीची वैशिष्ट्ये आहेत. सध्याच्या कलियुगात मात्र श्रीविष्णु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या रूपात भारतात जन्माला आला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारताच्या बाहेर सहस्रो कि.मी. दूर जाऊन एका विशिष्ट विषयावर संशोधन करण्याचे ठरवले. गुरुदेवांनी ‘संमोहन उपचार’ या विषयावर केलेल्या संशोधनामुळेच आज मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक प्रगती करून देणारी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ लाभली आहे. गुरुदेवांनी निवडलेले स्थान म्हणजे ज्या भूमीने अवतारभूमी असलेल्या भारताला गुलाम बनवून त्याच्यावर राज्य केले, तो ब्रिटन देश होय !

‘भगवंताची सुप्त नारायणीशक्ती त्याच्या इच्छेने त्याच्या सगुण रूपात कार्यरत असते’, हे जेवढे सत्य आहे, तसेच ‘भगवंताच्या सगुण उपस्थितीने भारित झालेल्या वस्तू आणि वास्तू यांमध्येही ती नारायणीशक्ती असते’, हेही तेवढेच सत्य आहे. ‘ब्रिटन ही एकेकाळी श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांची कर्मभूमी होती’, असेच म्हणता येईल.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संबंधित असलेल्या सर्व वास्तूंचे दर्शन घडल्याबद्दल श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी कृतज्ञता व्यक्त करणे

२६.४.२०२३ या दिवशी लंडन विमानतळावर उतरून लंडन शहराकडे जात असतांना आमच्या लक्षात आले की, तेथील बहुतांश वास्तू एकसारख्या आहेत. चालक म्हणून साहाय्य करत असलेले श्री. ललित पटेल यांनी आम्हाला सांगितले, ‘‘ब्रिटनमध्ये सरकारने प्रत्येक राजाच्या वेळी अशी पद्धत घातली होती की, सर्व वास्तू बाहेरून दिसतांना एका प्रकारच्या किंवा एका रंगाच्या असाव्यात; तसेच ब्रिटनमध्ये वास्तूचे बांधकाम न्यूनतम १०० वर्षे टिकले पाहिजे. आजही ब्रिटनमध्ये २०० वर्षे जुन्या झालेल्या वास्तू सुस्थितीत आहेत. ‘गुरुदेवांनी संशोधनासाठी ब्रिटन देश निवडल्यामुळे तब्बल ५० वर्षांनंतरही श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना त्या त्या वास्तूंचे दर्शन घडले’, याबद्दल श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ प्रवासामध्ये गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत होत्या.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या घराचे दर्शन घेतल्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची भावजागृती होणे अन् ‘एक विशेष दैवी शक्ती शरिरात प्रवेश करत आहे’, असे त्यांना जाणवणे

एरव्ही रुग्णालयाच्या सदनिकेतच निवास करणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. बाळाजी आठवले यांनी वर्ष १९७४ मध्ये शनिवार-रविवार या सुट्यांच्या दिवशी रहाण्यासाठी घर विकत घेतले होते. त्याचा पत्ता होता – १०, ओंबरस्ले रोड, न्यूपोर्ट, वेल्स, ग्रेट ब्रिटन. पुढे त्यांनी ते घर विकले. २७.४.२०२३ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या ठिकाणी गेल्यावर त्यांची पुष्कळ भावजागृती झाली अन् त्यांच्या अंगावर शहारे आले. ‘एक विशेष दैवी शक्ती त्यांच्या शरिरात प्रवेश करत आहे’, असे त्यांना वाटले. दोघींना आपल्या गुरुमाऊलींची पुष्कळ आठवण आली. समवेत ब्रिटनमध्ये रहाणारे साधक डॉ. मिलिंद खरे हेही होते.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वी चालू केलेल्या दुकानाचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दर्शन घेणे अन् त्या ठिकाणी प्रार्थना करणे

वर्ष १९७६ ते १९७८ या कालावधीत रुग्णालयाच्या नोकरीच्या व्यतिरिक्तचा वेळ वापरला जाण्यासाठी गुरुदेवांनी ‘फायबर ग्लास’च्या फर्निचरचे दुकान चालू केले होते. त्या दुकानाचे नाव होते, ‘ग्वेंट फायबर ग्लास सप्लाईज अँड फर्निचर’. भारतात परतण्यापूर्वी त्यांनी ते बंद केले. हे दुकान गुरुदेवांच्या सदनिकेपासून २ कि.मी. अंतरावर आहे. तेथे गेल्यावर लक्षात आले, ‘आता तेथे कोणतेही दुकान नाही. पूर्वी ज्यांचे दुकान होते, ते सध्या बंद आहे.’ बंद असलेल्या दुकानाच्या शटरसमोर उभे राहून प्रार्थना करून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ गुरुदेवांनी नोकरी केलेल्या रुग्णालयाकडे जायला निघाल्या.

६. एका वयस्कर व्यक्तीने साहाय्य केल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी नोकरी करत असलेल्या रुग्णालयाचे दर्शन होणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. बाळाजी आठवले यांनी वर्ष १९७१ ते १९७८ या कालावधीत ब्रिटनमधील ‘लॅनफ्रेच्पा ग्रेंज हॉस्पिटल’ (कुम्ब्रान, ग्वेंट, वेल्स) या रुग्णालयात ‘डॉक्टर’ म्हणून नोकरी करतांना संमोहन उपचारपद्धतींविषयी संशोधन केले. कुम्ब्रान हे गाव न्यूपोर्ट शहरातील गुरुदेवांच्या सदनिकेपासून १० कि.मी. दूर आहे. पूर्वीच्या तुलनेत आताचे ‘लॅनफ्रेच्पा ग्रेंज हॉस्पिटल’ एका मोठ्या विश्वविद्यालयासारखे झाले आहे. पूर्वीच्या २ – ३ मजली इमारती पाडून आता त्या ठिकाणी ७ – ८ मजली इमारती झाल्या आहेत. आश्चर्य म्हणजे रुग्णालयाचे मुख्य कार्यालय मात्र अजूनही ८० वर्षांच्या त्याच इमारतीत आहे. त्यामुळे आम्हाला मुख्य कार्यालयात जाता आले. तेथे गेल्यावर कळले, ‘तेथील सर्व लोक नवीन आहेत.’ तेथे ‘पूर्वी हे रुग्णालय कसे होते ?’, हे सांगणार्‍या मागच्या पिढीतील कुणीच नव्हते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ ‘लॅनफ्रेच्पा ग्रेंज हॉस्पिटल’च्या मुख्य कार्यालयासमोर उभ्या राहून प्रार्थना करत असतांना एक वयस्कर व्यक्ती आली. सहज त्यांची ओळख झाली आणि ती व्यक्ती म्हणाली, ‘‘मी जन्मापासून इकडेच रहातो. गेल्या ६० वर्षांपासून मी या परिसरात आहेत.’’ त्या व्यक्तीने ‘पूर्वीचे रुग्णालय कुठे होते ?’, हे दाखवले. त्या व्यक्तीचे नाव ‘डेविड’ होते. ‘ईश्वरानेच श्री. डेविड यांना पाठवले’, असे सर्वांना वाटले.

– श्री. विनायक दयानंद शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (१७.५.२०२३)