धूर्त युरोपियनांनी हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा विपरीत इतिहास लिहिणे !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

हिंदु संस्कृतीला अधम ठरवण्याकरता या धूर्त युरोपियनांनी आमची समन्वय पद्धती नाकारली. ऐतिहासिक पद्धतीने हिंदुस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करून हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा विपरीत इतिहास लिहिला. तो इतिहास सत्य गृहित धरून आमच्या धर्मवाङ्मय आणि परंपर यांचा अभ्यास आम्ही चालू केला. त्याला चिकित्सक (critical) अभ्यास असे गोंडस नाव दिले आणि हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची केला.

(साभार : मासिक घनगर्जित, ऑक्टोबर २०१९)