जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराजांच्‍या दर्शनासाठी शरद पवार २५ वर्षांनी देहू (पुणे) येथील मंदिरात गेले !

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराजांच्‍या दर्शनासाठी शरद पवार २५ वर्षांनी देहू (पुणे) येथील मंदिरात गेले

देहू (जिल्‍हा पुणे) – राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी ६ मार्च या दिवशी देहूमध्‍ये जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराजांच्‍या मंदिरात येऊन दर्शन घेतले. जवळजवळ २५ वर्षांनंतर शरद पवार जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज मंदिरात पाऊल ठेवले आहे. तुकाराम महाराजांच्‍या मुख्‍य मंदिरात शरद पवारांनी विठूमाऊलीचेही दर्शन घेतले. जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांच्‍या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण दिनदर्शिका अनावरण सोहळा शरद पवार यांच्‍या हस्‍ते पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्‍या पत्नी सौ. प्रतिभा पवारही उपस्‍थित होत्‍या. शरद पवार यांचा तुकाराम पगडी घालून सत्‍कार करण्‍यात आला.

या वेळी शरद पवार म्‍हणाले की, आळंदी-देहूत आल्‍यानंतर मानसिक समाधान मिळते. मोरे घराणे हे मूळ घराणे आहे, त्‍यांनी सुचवले की, संताच्‍या जीवनावर आधारित दूरचित्रवाणी दाखवा. येत्‍या आठवड्यात यासंदर्भात चर्चा करण्‍यासाठी मी त्‍यांना बोलावले आहे. दूरचित्रवाणीद्वारे इतिहास पोचवण्‍यासाठी प्रयत्न करूया, असे मत शरद पवार यांनी व्‍यक्‍त केले.