(म्हणे) ‘भारत पाकिस्तानशी चर्चा का करत नाही ?’-फारूख अब्दुल्ला

फारूख अब्दुल्ला यांचे पाकधार्जिणा प्रश्न

फारूख अब्दुल्ला

श्रीनगर – भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या चीनसमवेत भारत चर्चा करतो, तर पाकिस्तानशी चर्चा का करत नाही ?, असा पाकधार्जिणा प्रश्न ‘नॅशनल कॉन्फरन्स’ या पक्षाचे नेते तथा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलतांना सरकारला विचारला. पाकिस्तान चर्चेसाठी सिद्ध आहे; पण आपणच सिद्ध नाही, अशी मखलाशीही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, ‘‘भाजपमुळेच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही. भाजपला असे वाटत असेल की, धर्माच्या आधारावर आपण निवडणूक जिंकू, तर ते जम्मू-काश्मीरला अडचणीत आणत आहेत. आपल्याला भारताला वाचवण्यासाठी हा भेद दूर करायला हवा.’’

संपादकीय भूमिका

पाकचा इतकाच पुळका असलेल्यांना सरकार पाकमध्ये हाकलून का देत नाही ?