(म्हणे) ‘संभाजीनगर नावाला विरोध करतच रहाणार !’-इम्तियाज जलील

  • एम्.आय.एम्.चे इम्तियाज जलील यांचे हिंदुद्वेष विधान

  • छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नसल्याचे स्पष्टीकरण !

संभाजीनगर – आमचा छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नाही; पण यापूर्वीही मी संभाजीनगर नावाला विरोध केला होता आणि यापुढे ही करत रहाणार, असे हिंदुद्वेषी विधान जिल्ह्याचे खासदार आणि एम्.आय.एम्. पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केले. २४ फेब्रुवारी या दिवशी केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला संमती दिली. गेली अनेक वर्षे हे नामांतर मुसलमानांच्या लांगूलचालनामुळे रखडले होते.

जलील पुढे म्हणाले, ‘‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचाच आदर करतो; मात्र त्यांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केले नाही. सरकारने शहराचे नाव पालटले आहे; मात्र जिल्ह्याचे नाव अजूनही औरंगाबदच आहे. ते पालटता येत नाही. सरकारने घेतलेला निर्णय मला पटत नसेल, तर त्याला मी विरोध करू शकतो. माझा तो अधिकार आहे.’’

 संभाजीनगर नामांतराचा सर्व सामान्य नागरिकांनी विरोध करावा – इम्तियाज जलील

संपादकीय भूमिका

छत्रपती संभाजी महाराज यांना विरोध नसल्याचे सागंणारे संभाजी महाराजांना हालहाल करून ठार मारणार्‍या औरंगजेबाच्या कृत्याला कधी चुकीचे ठरवत नाहीत, हे लक्षात घ्या !