(म्हणे) ‘भारताने भूकंपग्रस्ततुर्कीयेला केलेले साहाय्य हा दिखाऊपणा !’ – भुकेकंगाल झालेल्या पाकिस्तानातील नागरिकाची भारतविरोधी गरळओक !

अनेक भारतद्वेषी विधाने असलेला व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – तुर्कीयेमध्ये झालेल्या भूकंपावरून भारत ‘ऑपरेशन दोस्त’च्या अंतर्गत तुर्कीयेला साहाय्य करत आहे. यावर एका पाकिस्तानी नागरिकाला प्रश्न विचारला असता त्याने म्हटले की, पाकिस्तान तुर्कीयेला साहाय्य करत असून भारत केवळ दिखाऊपणा करत आहे. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून तो पाकिस्तानी लोकांची भारताविषयीच्या मानिसकतेचे प्रतिनिधित्व करतो, असे मत भारतियांकडून व्यक्त केले जात आहे.

या व्हिडिओमध्ये पुढे त्या व्यक्तीला विचारण्यात आले की, तुर्कीयेचे नागरिक घरांतून निघतांना स्वत:समवेत भारताचा राष्ट्रध्वज घेत आहेत. त्यावर ती व्यक्ती म्हणते की, तिरंग्याचे तुम्ही जेव्हा-जेव्हा नाव घेतले, तेव्हा-तेव्हा माझ्या आत राग निर्माण झाला. जर भारत-पाकिस्तानच्या सीमा उघडण्यात आल्या, तर पाकिस्तानातील मुलेच भारताला कह्यात घेतील.

व्हिडिओत ती व्यक्ती पुढे म्हणते की, भारत हा भाज्या खाणारा देश आहे. भारतीय लोक मांस खात नाहीत. त्यांना रागही येत नाही. जो शाकाहारी असतो, तो केवळ दिखाऊपणा करतो. भारत एक हिंदु देश आहे.

संपादकीय भूमिका

  • ज्या देशातील ३ वर्षांच्या मुलांनाही भारताविषयी विष पाजून ‘हिंदु कुत्ता’ म्हणण्याचे त्यांच्यावर संस्कार केले जातात, तेथील नागरिकांकडून भारतद्वेष सोडून अन्य कोणती अपेक्षा करणार ?
  • ‘लाखो पाकिस्तानी नागरिक भारताशी चांगल्या संबंधांची कामना करतात’, असे म्हणणारे गीतकार जावेद अख्तर यांना आता काय म्हणायचे आहे ?