सातारा, ३ फेब्रुवारी (वार्ता.) – काळी-पिवळी जीप, टॅक्सीचे योग्यता प्रमाणपत्र २५ वर्षांपर्यंत वाढवून द्या, अशी मागणी सातारा जिल्हा काळी-पिवळी टॅक्सी, जीप, टुरिस्ट वाहतूक संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, खाटुआ समितीच्या सूचनेची कार्यवाही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून चालू आहे. जिल्ह्यातील काळी-पिवळी जीप, टॅक्सीची वयोमर्यादा नोंदणी दिनांकापासून २० वर्षे निश्चित करण्यात आली आहे; मात्र कोरोनाच्या काळात वाहतूक व्यवसाय बंद अवस्थेत होता. त्या काळात प्रवासी कोरोनाच्या भीतीमुळे प्रवास करण्यास धजावत नव्हते. यामुळे प्रवासी वाहतूक व्यवसायावर मोठा परिणाम झाला.