‘तोंड येणे’ यावर घरगुती उपचार

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२६

वैद्य मेघराज पराडकर

‘जाई, आंबा, औदुंबर आणि पेरू यांपैकी कोणत्याही एका झाडाची १ – २ पाने दिवसातून ३ – ४ वेळा चावून चावून २ मिनिटे तोंडात धरून मग थुंकावीत. एका दिवसात गुण येतो. ही झाडे आपल्या भोवताली नसतील, तर शक्य असल्यास त्यांची लागवड करावी.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२२)