प्रतिदिन दातांची काळजी घ्यावी !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२५

‘एवढ्याशा दातांवरील उपचार किती खर्चिक आणि वेदनादायी असतात’, हे जेव्हा दंतवैद्यांकडे जावे लागते, तेव्हा समजते. ‘ती वेळ आपल्यावर येऊ नये’, यासाठी प्रतिदिन सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत. काहीही खाल्ल्यावर प्रत्येक वेळी २-३ चुळा भराव्यात, तसेच बोटांनी दात नीट स्वच्छ करावेत. दातांच्या फटींमध्ये काही अडकले असल्यास ते ‘ब्रश’च्या साहाय्याने त्या त्या वेळी काढावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२२)