लव्ह जिहादमध्ये हिंदु भगिनींचा बळी जाऊ देऊ नये ! – प्रकाश सावंत, अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना, महामुंबई

भांडुप येथे हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलन !

भांडुप येथील आंदोलनात सहभागी धर्मप्रेमी

मुंबई, २० डिसेंबर (वार्ता.) – आपल्या भगिनींचा लव्ह जिहादमध्ये बळी जाऊ देऊ नका. लव्ह जिहाद ही विकृती आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर तरी जागे व्हा ! मी आदिवासी पाड्यांत फिरतो, तेव्हा तेच स्वतः सांगतात की, इच्छा नसतांनाही आमचे धर्मांतर केले जाते, आम्हाला पैशांचे आमीष दाखवले जाते. मी लव्ह जिहादविरोधात एका हिंदु मुलीला सहकार्य केले, तर जिहादी मुसलमानांनी मला खोट्या गुन्ह्यांत अडकवले. त्यामुळे मला ९ दिवस कारागृहात रहावे लागले. लव्ह जिहाद किंवा धर्मांतर प्रकरणी काही अडचण असल्यास मला कधीही संपर्क करा. हिंदु समाज नव्हे, तर जिहादीच पोलिसांवर आक्रमण करतात, हेही एक कटू सत्य आहे, असे प्रतिपादन हिंदु राष्ट्र सेनेचे महामुंबई अध्यक्ष श्री. प्रकाश सावंत यांनी केले. ते भांडुप (प.) येथील रेल्वे स्थानकाजवळ करण्यात आलेल्या हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलनात बोलत होते. या वेळी शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. आंदोलनात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या प्रतिनिधींसह सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन घाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. प्रेम पुजारी आदी धर्मप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

क्षणचित्रे

१. लोक हस्तफलकांवरील लिखाण थांबून वाचत होते, तसेच मार्गदर्शन ऐकत होते.

२. काहींनी आंदोलनाविषयी स्वतःहून जाणून घेतले.

वैशिष्ट्यपूर्ण

आंदोलनाचे ‘फेसबुक लाइव्ह’ करतांना अचानक काळोख झाला, तेव्हा तेथे व्यवसाय करणारे श्री. राजेश शहा उपाख्य सोनी यांनी तत्परतेने स्वतःहून बॅटरीवरील प्रकाशयोजनेची सोय केली. पुढेही आवश्यक सहकार्य करणार असल्याचे सांगितले.