‘रामनाथी आश्रम ‘वैकुंठ आहे’, असा भाव असल्याने ‘मुलाच्या विवाहानंतर देवदर्शनाला बाहेरगावी जाण्याची आवश्यकता नाही’, असा विचार करणार्‍या श्रीमती संध्या बधाले !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘नुकतेच, म्हणजे २८.११.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात श्री. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा शुभविवाह पार पडला. मागील ६ – ७ वर्षांपासून बधाले कुटुंब रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे.

श्रीमती संध्या बधाले

विवाहाच्या निमित्ताने माझी श्री. अतुल बधाले यांची आई श्रीमती संध्या बधाले यांच्याशी भेट झाली. विवाहाच्या सिद्धतेविषयी बोलतांना विवाहानंतर देवदर्शनाला जाण्याचा विषय निघाला. त्या वेळी श्रीमती संध्या बधाले उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ‘‘रामनाथी आश्रम म्हणजे वैकुंठच आहे. या वैकुंठाला प्रदक्षिणा घातल्या, तरी आम्हाला सर्व देवतांचे (सूक्ष्मातून) दर्शन होईल !’’ त्यामुळे ‘देवदर्शनाला वेगळे आणि बाहेरगावी जाण्याची आवश्यकता नाही’, असे त्यांना वाटत होते. यातून ‘श्रीमती बधाले यांचा रामनाथी आश्रमाप्रती किती उत्कट भाव आहे’, हे माझ्या लक्षात आले.

परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेली आणि त्यांच्या चैतन्यमय अस्तित्वाने परम पवित्र बनलेली रामनाथी आश्रमाची वास्तू खरोखरंच एक दिव्य अन् आनंददायी भूमी बनली आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ‘सर्वही तीर्थे घडली देवा । सद्गुरुचरणासी ।।’ हे त्रिवार सत्य असून सर्व साधकांनी श्रीमती बधाले यांच्याप्रमाणे भाव ठेवल्यास त्यांनाही आश्रमाचा आणि येथील चैतन्याचा साधनेसाठी लाभ करून घेता येईल.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक