रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर साधकाला आलेल्‍या अनुभूती

श्री. प्रशांत वसंतराव बाकडे

१. नवीन सेवा करतांना आनंद मिळणे 

एकदा मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात जाण्‍याची संधी मिळाली. तिथे मला ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, हे शिकायला मिळाले. त्‍यानंतर मला काही नवीन सेवा प्रथमच करायला मिळाल्‍या. त्‍या करतांनाही मला पुष्‍कळ आनंद मिळाला.

२. एका साधकांच्‍या घरी  नामजप करतांना आलेली अनुभूती

त्‍यानंतर एकदा मी गोवा येथील श्री. मुकुंद वैद्य यांच्‍या घरी नामजप करत होतो. तेव्‍हा मला पुढील दृश्‍य दिसले. ‘भूमी हलत आहे आणि मी पुष्‍कळ मोठ्या लाटा असलेल्‍या पाण्‍यामध्‍ये गटांगळ्‍या खात आहे. त्‍या वेळी परात्‍पर गुरुदेवांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) माझा हात पकडला. त्‍यामुळे त्‍या मोठ्या लाटांपासून मी सुरक्षित राहिलो. हे अनुभवतांना मला आनंद वाटत होता. तेव्‍हा परात्‍पर गुरुदेवांनी माझा हात पकडला असून ‘आता मला काहीच नको’, असे मला वाटत होते.’

३. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले  यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी आलेली अनुभूती

एकदा मला ‘परात्‍पर गुरुदेव यांचा सत्‍संग आहे’, असे कळले. तेव्‍हा मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. त्‍या वेळी ‘मला साक्षात् देव भेटणार आहे आणि गुरुदेवांमध्‍ये मला विष्‍णुरूप पहायचे आहे’, असा विचार माझ्‍या मनात आला. प्रत्‍यक्षात सत्‍संगाच्‍या वेळीही मी त्‍यांच्‍यातील विष्‍णुरूपच पाहिले. सत्‍संगात गुरुदेवांमुळे मला पुष्‍कळ आनंद मिळाला. तेव्‍हा श्री. वैद्य यांच्‍या घरी नामजप करतांना मला जे दृश्‍य दिसले, त्‍याचे कारण मला कळले.

‘गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रशांत वसंतराव बाकडे, वर्धा, महाराष्‍ट्र.