साधकांना मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘साधारण ५ वर्षांपूवी मी रुग्णाईत असतांना इतिहासाशी संबंधित एक पुस्तक वाचत होतो. पूर्वी एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याने हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक लढाया लढून पराक्रम गाजवले; परंतु काही लेखकांनी इतिहासात त्याची नोंद नकारात्मक पद्धतीने केली. त्याचे खंडण करणारे हे पुस्तक होते. हे पुस्तक वाचल्यावर मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘हे पुस्तक अभ्यासपूर्ण असून त्यातील सत्य घटनांचा आपल्या ग्रंथात उल्लेख करायचा का ?’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘करूया; पण आता इतिहासाचा अभ्यास करण्याऐवजी हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी वेळ देणे अधिक महत्त्वाचे आहे.’’
हे ऐकून माझ्या मनाची पुढील विचारप्रक्रिया झाली, ‘इतिहासातील एकेक विषयांतील चुकांची दुरुस्ती करण्यात वेळ देण्याऐवजी हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी वेळ दिल्यास ते आल्यानंतर सत्य इतिहास लिहिण्यास महत्त्व दिले जाईल. त्या समवेत हिंदूंच्या अन्यही सर्वच समस्या सुटणार आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनासानुसार ‘आपली प्रत्येक कृती आपल्या ध्येयाच्या, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने आहे का ?’, हे पहाणे महत्त्वाचे आहे, हे वरील प्रसंगातून माझ्या लक्षात आले.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.२.२०२०)