साधकांचे रक्षणकर्ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘ज्या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले, त्या वेळी स्वागतकक्षाच्या जवळ असलेल्या मुख्यद्वाराला कुलूप आणि कडी बसवायची होती. यासाठी गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) स्वतः तेथे आले होते. त्यांनी पूर्ण दरवाजावर हात फिरवून आधी दरवाजाची स्पंदने पाहिली आणि त्यानंतर सूक्ष्मातून कडी अन् कुलूप लावायची जागा ठरवून दिली.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

त्याप्रमाणे बांधकाम सेवेतील साधकाने तेथे कडी आणि कुलूप लावायची सोय करून दिली. यावरून लक्षात आले की, गुरुदेवांच्या माध्यमातून साक्षात् भगवंतानेच आश्रमाचा मुख्य दरवाजा, तसेच त्याचे कडी आणि कुलूप यांना स्पर्श करून आश्रमाभोवती चैतन्याचे वज्रकवच निर्माण केले. त्यानंतर सनातनवर अनेक संकटे आली, तरी साधक ती सर्व संकटे पार करून पुढे गेले. धन्य ती गुरुकृपा आणि साधकांचे रक्षणकर्ते गुरुदेव !’

– सौ. अंजली गाडगीळ, कांचिपूरम्, तमिळनाडू. (४.१२.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.