श्रेष्ठ साधना, म्हणजे परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) जाणणे ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

 ‘१६.७.२०१९ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझा संतसन्मान सोहळा झाला. तेव्हा पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या समष्टी संत) यांनी मला सनातनच्या साधकांना संदेश देण्यासंबंधी विचारले. तेव्हा गुरुकृपेने मी म्हणालो, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांना जाणणे’, हीच आपली उच्च कोटीची साधना आहे. यातूनच आपल्यातील चैतन्यात वृद्धी होणार आहे.’’ मागील ३० वर्षे मी परात्पर गुरु डॉक्टरांना पुढीलप्रमाणे जाणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातूनच ते माझी साधना करून घेत आहेत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मनोरुग्ण औषधोपचार घेण्या जात असती (टीप १) ।
परम पूज्यांना (टीप २) ‘संमोहन-उपचारतज्ञ’ म्हणत असती ।। १ ।।

(पू.) शिवाजी वटकर

जिज्ञासू अभ्यासवर्ग अन् सत्संगाला जात असती (टीप ३) ।
परम पूज्यांना ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाचे ‘निर्माते’ म्हणती ।। २ ।।

प.पू. भक्तराज महाराज भ्रमण, भंडारा अन् भजन करत असती ।
परम पूज्यांना ते ‘शिष्योत्तम’ म्हणत असती ।। ३ ।।

साधक साधना अन् सेवा करती  ।
परम पूज्यांना ‘परात्पर गुरु’ म्हणती ।। ४ ।।

पू. डॉ. ॐ उलगनाथन् जीवनाडीचे वाचन करती ।
महर्षि परम पूज्यांना ‘विष्णूचे अवतार’ म्हणती ।। ५ ।।

श्रेष्ठ साधना, म्हणजे परम पूज्यांना जाणणे ।
साध्य होईल याच जन्मात मोक्ष मिळणे’ ।। ६ ।।

टीप १ आणि २ – परात्पर गुरु डॉ. आठवले संमोहन उपचारतज्ञ होते. पूर्वी मनोरुग्ण त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी जात असत.

टीप ३ – पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले जिज्ञासूंसाठी अभ्यासवर्ग आणि सत्संग घेत असत.

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी संत), वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.