
‘गेली काही वर्षे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) यांनी आम्हा साधकांना सनातनच्या ग्रंथांच्या निर्मितीची सेवा पुष्कळ श्रम घेऊन आणि वेळ देऊन शिकवली. या काळात नवीन ग्रंथ सिद्ध करण्याचा मोठा भार ते स्वत:च उचलायचे आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही सेवा करायचो. काही काळापासून ते वयोमान आणि आजारपण यांमुळे नवीन ग्रंथांच्या निर्मितीच्या सेवेत पूर्वीएवढा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही साधकच आता त्यांनी शिकवलेल्यानुसार नवीन ग्रंथांच्या निर्मितीची सेवा करायचा प्रयत्न करतो. सध्या मी बर्याचदा असे अनुभवत आहे, ‘ग्रंथ सिद्ध करतांना विषयाचे आकलन होणे, लिखाणात सुधारणा सुचणे, नवीन नवीन विचार किंवा कल्पना सुचणे’ आदी पूर्वीपेक्षा अधिक गतीने आणि सहजतेने होते.

यावरून हे लक्षात आले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा ग्रंथकार्यासाठी संकल्प झालेला आहे; पण ते आता स्वतः तेवढा वेळ देऊ शकत नसले, तरी संकल्पमात्रे आमची क्षमता वाढवत आहेत !’ हे लक्षात घेऊन सर्वच साधकांनी कोणतीही गुरुसेवा पूर्ण करतांना ताण घ्यायला नको किंवा ‘आपल्याला जमेल कि नाही’, असा विचार करून सेवेचे दायित्व टाळायचा विचार करायला नको. याचे कारण म्हणजे, सर्वच सेवांसाठी गुरुदेवांचा संकल्प कार्यरत झालेला असून आपल्यापेक्षा त्यांनाच गुरुकार्याची अधिक काळजी असल्याने ते आपल्याकडून अधिक क्षमतेने सेवा करवून घेणारच आहेत ! केवळ आपल्याला त्यांना सारखे सारखे शरण जायचे आहे !’
– (पू.) संदीप आळशी (२७.११.२०२४)