आगरा (उत्तरप्रदेश) येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड

पुजार्‍यालाही मारहाण

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील तोता खाई भागातील बालाजी मंदिरामध्ये तोडफोड आणि पुजार्‍याला मारहाण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी निझाम अन् गुलफाम या दोघांना अटक केली आहे. त्यांनी मंदिरामध्ये येऊन मद्यसेवन करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना विरोध करण्यात आल्याने त्यांनी ही तोडफोड केली.

याविषयी मंदिराचे विश्‍वस्त रवि कुमार यांनी सांगितले की, या दोघांनी पोलीस ठाण्यात क्षमायाचना केली आहे. आम्ही हे प्रकरण वाढवू इच्छित नाही. कारण या भागामध्ये हिंदु आणि मुसलमान यांची संख्या समान आहे. मंदिराजवळच एक मशीदही आहे. (हिंदू समान संख्येने असतांनाही मुसलमानांना घाबरतात, तर धर्मांध मुसलमान अल्पसंख्यांक असले, तरी हिंदूंवर आक्रमण करतात, त्यांना पलायन करण्यास बाध्य करतात ! – संपादक)

संपादकीय भूमिका

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केलेल्या विधानावरून नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देणार्‍यांचे धर्मबांधव हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतात त्या वेळी हिंदू वैध मार्गाने विरोध करतात. यावर हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारे तोंड उघडतील का ?