अन्य पंथीय युवतीकडून सनातनच्या आश्रमात येऊन ‘सनातनमध्ये यायचे आहे’, असे खोटे सांगून साधकांची माहिती काढण्याचा प्रयत्न !

‘सनातन संस्थेच्या एका आश्रमात नुकतीच एक अन्य पंथीय युवती (वय अंदाजे २० वर्षे) आली होती. तिने तिचे नाव …. असे सांगितले. यानंतर तिने आश्रमातील स्वागतकक्षावरील साधिकेला आश्रम, तसेच अन्य जिल्ह्यांतील काही साधक यांच्याविषयी प्रश्न विचारले आणि माहिती काढण्याचा प्रयत्न केला. या युवतीने चेहर्‍यावर रुमाल बांधलेला असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता. या युवतीचे स्वागतकक्षावरील साधिकेशी झालेले संभाषण येते देत आहोत.

युवती : मी …पंथीय असून मला सनातनमध्ये यायचे आहे.
साधिका : सनातनमध्ये यावेसे का वाटते ?

युवती : आमच्या समाजात पुष्कळ बंधने लादली जातात. ते मला पटत नाही. मला श्रीकृष्ण आवडतो; मात्र आमच्या धर्मात ते आवडत नाही. त्यामुळे मला सनातनमध्ये यायचे आहे.
साधिका : घरी कोण कोण आहेत ? आणि ते काय करतात ?

युवती : घरी सर्व शिकलेले आहेत. ते सर्वजण आमचे धर्मगुरु सांगतात, तसेच करतात. ते मला पटत नाही.
साधिका : तुला घरचे रागावतील. त्यांना पटणार नाही; मग तू असे का करत आहेस ?

युवती : हो, त्यांना पटणार नाही. ते मला घरातून बाहेर काढतील आणि मला एकटीला रहावे लागेल. तुम्ही विवाह केला आहे का ?
साधिका : नाही.

युवती : मलाही करायचा नाही; पण या संदर्भात मला आमच्या घरी बोलतात. आपण आनंदी रहायचे. आपल्या मनाला शांत वाटले पाहिजे. … संप्रदायाविषयी कसे असते ?
साधिका : त्या संप्रदायाविषयी संकेतस्थळावर पाहू शकतेस.

युवती : एक हिंदुत्वनिष्ठ येथे येतात का ?
साधिका : नाही

युवती : … शहरात तुमचे कोण प्रमुख आहेत ? तिकडे कुणी ओळखीचे आहे का ?
साधिका : नाही. तुझा संपर्क क्रमांक दे. मी तुला संपर्क करते.

युवती : माझ्याकडे भ्रमणभाष नाही. घरचे मला भ्रमणभाष देत नाहीत.
साधिकेने युवतीकडे तिचा पत्ता मागितला असता तिने पत्ता दिला नाही. साधिकेने तिला ‘तू ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करू शकतेस’, असे सांगितले. आश्रमातून जातांना युवतीने ‘मी इकडे आले, हे कुणाला सांगू नका’, असे सांगितले.’