बांगलादेशात मुसलमान शिक्षकाने बलपूर्वक केले हिंदु विद्यार्थिनीचे धर्मांतर !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यात महंमद राब मियाँ नावाच्या एका धर्मांध शिक्षकाने अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनी मनीषा पाल हिचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली. ही माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने त्यांच्या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून दिली.

संपादकीय भूमिका

भारत सरकारने बांगलादेशी हिंदूंवरील आघातांच्या विरोधात आवाज उठवल्याखेरीज अशा घटना कशा थांबतील ?