|
कोटा (राजस्थान) – राजस्थानमधील कोटा पोलिसांनी आगामी गणेशोत्सव आणि दुर्गापूजा यांसाठी मूर्ती बनवणार्या मूर्तीकारांना काही निर्बंधांसह मार्गदर्शक तत्त्वे पाठवली आहेत. या सूचनांमध्ये श्री गणेश आणि श्री दुर्गामाता यांच्या मातीच्या मूर्तींची उंची ३ फुटांपेक्षा अधिक नसावी, तसेच ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती बनवू नयेत, असे नमूद करण्यात आले आहे. ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी देण्यात आलेल्या या आदेशाचे पालन न करणार्या मूर्तीकारांच्या मूर्ती जप्त करण्याची चेतावणी देण्यात आली आहे. ‘या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले जाते, त्यामुळे जलप्रदूषण होऊन जलचरांना धोका निर्माण होतो’, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
मूर्तीकारांकडून निर्बंध हटवण्याची मागणी !
प्रशासनाने अनेक मूर्तीकारांना या नोटिसा पाठवल्या आहेत. या आदेशामुळे मूर्तीकारांची चांगलीच अडचण होत असून मूर्तींच्या उंचीवरील निर्बंध हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. शेकडो मूर्ती यापूर्वीच बनवल्याचे त्यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकासर्वत्रच्या पोलिसांनी अशी भूमिका घ्यायला हवी, असेच हिंदूंना वाटते ! |