शाळांना रविवारऐवजी शुक्रवारची सुटी, म्हणजे झारखंडची इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल !

  • भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा संसदेत आरोप

  • या प्रकरणाची ‘एन्.आय.ए.’कडून चौकशी करण्याची मागणी

नवी देहली – झारखंड राज्यातील १ सहस्र ८०० शाळांमध्ये रविवारऐवजी ‘शुक्रवारी’ सुटी दिली जात आहे. अचानक या शाळांनी त्यांच्या नावांपुढे ‘उर्दू’ असे लिहिले आहे. हे भारत इस्लामीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे द्योतक आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (‘एन्.आय.ए.’कडून) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत केली.

 (सौजन्य : नवभारत टाइम्स) 

खासदार दुबे म्हणाले की, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल बिघडला आहे. हे जिल्हे बांगलादेशच्या जवळ असल्याने असे झाले आहे. याद्वारे झारखंडचे इस्लामीकरण होत आहे.