यायर लॅपिड बनले इस्रायलचे १४ वे पंतप्रधान !

यायर लॅपिड

तेल अवीव (इस्रायल) – इस्रायलचे १४ वे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी पदभार स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यायर यांचे अभिनंदन केले आहे. लॅपिड यांनी ३० जूनच्या मध्यरात्री अधिकृतपणे इस्रायलच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. १ नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी काळजीवाहू सरकारच्या प्रमुखपदी नियुक्त झाल्यामुळे लॅपिड यांचा कार्यकाळ अल्प होऊ शकतो.