अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्यासाठी आलेले ३ आतंकवादी ठार  

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील बेमिना भागात सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले. येत्या ३० जूनपासून चालू होणार्‍या अमरनाथ यात्रेवर आक्रमण  करण्याचा या आतंकवाद्यांचा कट होता.

ठार झालेल्या आतंकवाद्यांच्या समवेत श्रीनगर भागातील एक स्थानिक रहिवासी असलेला आतंकवादीही होता. त्याचे नाव आदिल हुसैन मीर असून तो पहलगाम येथील रहिवासी होता, तर पाकिस्तानमधून आलेल्या २ आतंकवाद्यांपैकी एकाचे नाव अब्दुल्ला गौजरी असे होते.