ज्ञानयोगी संत पू. अनंत बाळाजी आठवले यांच्या हस्तलिखितातून (हस्ताक्षरातून) पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

हस्ताक्षराविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सूक्ष्मातील प्रयोगाचे उत्तर

छायाचित्र ‘अ’ कडे पाहून त्रासदायक वाटते. हे हस्ताक्षर दिसायला सुंदर आहे; पण या व्यक्तीला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने तिच्या हस्ताक्षरातून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत.

छायाचित्र ‘आ’ कडे पाहून थोडे त्रासदायक; पण थोडे चांगलेही वाटते. हे हस्ताक्षर दिसायला सर्वसाधारण आहे. या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास नाही; पण तिच्या लिखाणाभोवती त्रासदायक आवरण असल्याने थोडा त्रास जाणवतो.

छायाचित्र ‘इ’ कडे पाहून खूप चांगले आणि शांत वाटते. हे हस्ताक्षर ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले यांचे आहे. संतांच्या हस्ताक्षरातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने त्याकडे पाहून चैतन्य आणि शांती याची अनुभूती येते.

सूक्ष्मातील प्रयोग : हस्ताक्षर छायाचित्र ‘अ’, ‘आ’ आणि ‘इ’ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/567260.html 

_______________________________________

‘भक्ती, कर्म, ध्यान, ज्ञान आदी ईश्वरप्राप्तीचे विविध साधनामार्ग आहेत. सध्याच्या काळात ज्ञानयोगानुसार साधना करणे अत्यंत कठीण आहे; कारण ज्ञानयोगानुसार साधना करता येण्यासाठी जिवाची प्रज्ञा अत्यंत शुद्ध असावी लागते. आताच्या कलियुगात ज्ञानयोगानुसार साधना करून संतपद प्राप्त केलेले पू. अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे थोरले बंधू) हे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व आहेत. (पू. अनंत आठवले यांना २७.६.२०१९ या दिवशी सनातनच्या १०१ व्या संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.)

संत ईश्वराशी एकरूप झालेले असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य असते. संतांच्या हस्ताक्षरातून चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे संतांची हस्तलिखिते जतन करण्याची हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले यांच्या हस्ताक्षरातून (लिखाणातून) प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.


पू. अनंत आठवले

१. पू. अनंत आठवले यांच्या हस्ताक्षरामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे

या चाचणीत पू. अनंत आठवले यांच्या हस्ताक्षराची आणि तुलनेसाठी म्हणून सर्वसाधारण व्यक्तीचे हस्ताक्षर आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीचे हस्ताक्षर यांचीही निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. व्यक्तीच्या हस्ताक्षरातून (लिखाणातून) प्रक्षेपित होणारी स्पंदने अवलंबून असणारे घटक : व्यक्तीच्या हस्ताक्षरातून (लिखाणातून) प्रक्षेपित होणारी स्पंदने तिची आध्यात्मिक पातळी, तिला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, लिखाणाचा विषय, लिखाण करतांनाची तिची मनःस्थिती इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असतात. सर्वसाधारण व्यक्तीमध्ये रज-तमाचे प्रमाण अधिक असल्याने तिच्यामध्ये सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून येते. मुळातच सात्त्विक असलेल्या, तसेच साधना करणाऱ्या व्यक्तीमध्ये सकारात्मक स्पंदने आढळून येतात अन् तिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. जसजशी तिची साधना वाढते, तसतसे हे प्रमाण वाढत जाते.

२ आ. चाचणीतील सर्वसाधारण व्यक्तीचे हस्ताक्षर आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीचे हस्ताक्षर यांतून प्रक्षेपित झालेली स्पंदने : चाचणीतील सर्वसाधारण व्यक्तीच्या हस्ताक्षरात नकारात्मक अन् अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या व्यक्तीच्या हस्ताक्षरात सकारात्मक स्पंदने काहीच नसून पुष्कळ नकारात्मक स्पंदने आढळून आली.

२ इ. पू. अनंत आठवले यांच्या हस्ताक्षरामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे : संत ईश्वराशी एकरूप होऊन लिखाण करतात. त्यामुळे संतांच्या लिखाणात पुष्कळ सात्त्विकता येते. संतांमध्ये अहं अत्यल्प असल्याने त्यांच्याकडून होणारे सर्व लिखाण हे चैतन्याच्या स्तरावर होत असते. यामुळे संतांची हस्तलिखिते जतन करण्याची परंपरा आहे. पू. अनंत आठवले यांच्या हस्ताक्षरामध्ये नकारात्मक स्पंदने काहीच नसून पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळून आली आणि तिची प्रभावळ २१.३६ मीटर आहे; म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेत पुष्कळ अधिक आहे. ज्ञानयोगासारख्या अत्यंत कठीण साधनामार्गाने साधनारत असणारे पू. अनंत आठवले यांच्या हस्ताक्षराचा (लिखाणाचा) कागद हातात धरून त्याकडे पाहिल्यावर मनाला पुष्कळ शांत वाटत होते. संतांच्या हस्ताक्षरात एवढे चैतन्य आहे, तर प्रत्यक्ष संतांमध्ये किती अधिक प्रमाणात चैतन्य असेल !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.१.२०२२)

ई-मेल : [email protected]

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.