प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा सकारात्मक प्रतिसाद !
कोल्हापूर, १६ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय, लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. फलकप्रसिद्धी, भीत्तीपत्रके यांद्वारेही जिल्ह्यात ठिकठिकाणी जागृती करण्यात आली. निवेदन देण्यासाठी धर्मप्रेमींचाही पुढाकार होता.
अ. प्रशासन
१. गडहिंग्लज येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले, तर उपअधीक्षक पोलीस कार्यालयात पोलीस हवालदार विशाळ आंबोळे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी गोपालक श्री. संदीप लोहार, हिंदु जनजागृती समितीच्या कु. नयना दळवी, सर्वश्री गौतमेश तोरस्कर, दत्ताराम पाटील, सिद्राम कब्बूरे, संजीव चव्हाण, वामन बिलावर, प्रदीप वेरणेकर उपस्थित होते.
२. कागल येथे तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. किरण कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. चेतन चव्हाण, श्री. दशरथ डोंगळे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.
३. शाहूवाडी (मलकापूर) येथे पोलीस निरीक्षक विजय तुकाराम पाटील आणि तहसीलदार गुरु बिरादार उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रसाद कुलकर्णी, सुधाकर मिरजकर, अनंत डोणे, वैद्य संजय गांधी उपस्थित होते.
४. इचलकरंजी येथे अपर तहसील कार्यालयात अपर तहसीलदार शरद पाटील यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील श्री. सोमेश तेलवे, श्री. संकेत कुलकर्णी, कु. महिमा काबरा, कु. साक्षी हैडा उपस्थित होत्या. निवेदन स्वीकारल्यावर तहसीलदारांनी होळी आणि रंगपंचमी यांचा दिनांक विचारून घेतला, तसेच तात्काळ स्वीय साहाय्यक यांना बोलावून हे निवेदन पोलीस ठाण्यात पाठवून त्यावर योग्य त्या कृती करण्याच्या सूचना दिल्या. (सर्वत्रच्या प्रशासकीय अधिकार्यांनी अशी तत्परता दाखवल्यास होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार बंद होण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक)
आ. लोकप्रतिनिधी
१. म्हाकवे येथे सरपंच सौ. सुनिता महादेव चौगुले यांच्या वतीने त्यांचे यजमान श्री. महादेव चौगुले यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. अजित माळी आणि धर्मप्रेमी श्री. शिवाजी पाटील उपस्थित होते.
२. मत्तीवडे येथील सरपंच सौ. शालन चव्हाण यांना धर्मशिक्षणवर्गातील युवक आणि महिला यांनी निवेदन दिले.
३. केर्ली येथे सरपंच सौ. विजया चौगुले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्रीमती हौसाबाई बोडके, कु. शोभा माने, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विजया वेसणेकर उपस्थित होत्या.
४. चंदूर ग्रामपंचायत सरपंच सौ. अनिता माने, तसेच कबनूर ग्रामपंचायत येथे स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील युवक आणि युवती यांनी पुढाकार घेऊन निवेदन दिले.
होळी-रंगपंचीमच्या निमित्ताने त्याचे शास्त्र समजून सांगण्यासाठी ठिकठिकाणी प्रवचने घेण्यात आली. यात वडगाव येथील प्रवचनासाठी ३० जण उपस्थित होते, चोकाक येथेही धर्मप्रेमी महिलांसाठी प्रवचन घेण्यात आले. हे प्रवचन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. साधना गोडसे यांनी घेतले. |