अंबाला (हरियाणा) येथील जंगलात सापडले २३२ बाँब !

घटनास्थळी सापडलेले बाँब

अंबाला (हरियाणा) – येथील शहजादपूरच्या जंगलात २३२ बाँब सापडले आहेत. ग्रामस्थांना हे बाँब भूमीमध्ये गाडलेले आढळून आले. हे बाँब फार जुने असून त्यावर गंज चढला आहे. पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी बाँब निकामी करणार्‍या पथकाला बोलावले, तसेच हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. हे बाँब भारतीय सैन्याच्या अधिकार्‍यांकडे सुपुर्द केले जातील. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बाँब कुठून आले ? आणि ते कधीपासून येथे भूमीमध्ये गाडले गेले आहेत ? यांचे अन्वेषण पोलीस करत आहेत.