राज्यातील मदरशांचे आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार निधी उपलब्ध करून देणार !

  • राज्यातील गड, किल्ले आणि मंदिरे ही राज्यातील बहुसंख्य जनतेची आस्था असलेली स्थाने आहेत. त्यांची दुरवस्था झाली असतांना त्यांच्या जीर्णाेद्धारासाठी राज्य सरकार योजना राबवून आणि समिती गठीत करून निधी देत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक 
  • काही मदरशांमध्ये शस्त्रे आढळणे, अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचार होणे यांसारखे प्रकार झाल्याच्या घटना मधून मधून पुढे येत असतात. मदरशांमधून हिंदुद्वेषाचे धडे दिले जात असल्याचेही लक्षात येते. अशा मदरशांना निधी मिळत असेल, तर राष्ट्रविघातक शक्तींना चालना देण्यासारखेच आहे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ? – संपादक 
प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – राज्य सरकार ‘डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना’ राबवत आहे. या योजनेच्या अंतर्गत मदरशांचे आधुनिकीकरण आणि त्यांच्यामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. सर्व पात्र मदरसे या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करू शकतात, असे सांगण्यात आले आहे.