भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विकणार्‍या अ‍ॅमेझॉनवर गुन्हा नोंदवण्याचा मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा आदेश !

पोलिसांना असे आदेश का द्यावे लागतात ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? राष्ट्रप्रेमींनो ॲमेझॉनवर बहिष्कार घाला ! – संपादक

‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाकडून राष्ट्रध्वजाचा अवमान (डावीकडे) मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (उजवीकडे)

भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘अ‍ॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत. यापूर्वीही या आस्थापनाकडून राष्ट्रध्वजाच्या रंगासारखे बूट, पायपुसण्या, टॉयलेट सीट कव्हर, मास्क आदींची विक्री करण्यात आली होती. याविषयी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अ‍ॅमेझॉनवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली आहे.

गृहमंत्री मिश्रा यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण ध्वजसंहितेच्या उल्लंघनाचे दिसत आहे, जे दुःखदायक आहे. अशा प्रकारे राष्ट्राचा अवमान सहन करता येणार नाही. यापूर्वी चपलांवरही राष्ट्रध्वज छापण्यात आले होते.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक