आधुनिक वैद्यांनी औषधोपचार करूनही जखम लवकर बरी न होणे आणि सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेला नामजप केल्याने वेदना न्यून होऊन जखम ठीक होणे

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

१. गावाला गेल्यावर लाकूड तोडतांना उजव्या पायावर लाकूड पडल्याने अंगठ्याजवळच्या बोटाला खोल जखम होणे

‘५.१२.२०२० या दिवशी मी गावाला लाकूड तोडत होतो. तेव्हा माझ्या पायावर लाकूड पडले आणि माझ्या उजव्या पायाच्या तर्जनीला (अंगठ्याजवळच्या बोटाला) एक खोल जखम झाली. ५ – ६ दिवसांनी मी गावातील आधुनिक वैद्यांकडून औषध घेतले; पण जखम ठीक झाली नाही.

श्री. पांडुरंग दुदुमकर

२. मुंबई येथील एका आधुनिक वैद्यांनी औषधोपचार केल्यावर जखम वरवर बरी होणे; मात्र आतमध्ये ओली रहात असल्याने रात्रभर पुष्कळ ठणका लागणे

मी उपचारांसाठी मुंबईला आलो. मुंबईतील आधुनिक वैद्यांनी बोटाची ‘क्ष-किरण’ तपासणी करून माझ्या जखमेवर औषधोपचार केले. त्यांच्या औषधापचारांनी जखम वरवर बरी होत होती; पण ती आतमध्ये ओलीच रहायची. त्यामुळे मला रात्रभर पुष्कळ ठणका लागत असे.

३. सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांनी सांगितलेला नामजप केल्यावर वेदना न्यून होऊन बरे वाटू लागणे

मी मला होणारा त्रास उत्तरदायी साधिकेला कळवला. ६.८.२०२१ या दिवशी जखम लवकर भरून येण्यासाठी गुरुकृपेने मला सद्गुरु (सुश्री) अनुराधा वाडेकर यांनी ‘श्री दुर्गादेव्यै नमः। श्री गणेशाय नम: । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप करायला सांगितला. मी हा नामजप सतत आणि भावपूर्ण करू लागलो. मी हा नामजप केल्यावर माझ्या वेदना न्यून होऊन मला बरे वाटू लागले.

४. नामजप आणि दुसर्‍या आधुनिक वैद्यांचे औषधोपचार यांमुळे वेदना न्यून होऊन जखमही बरी होत येणे

त्यानंतर मी दुसर्‍या आधुनिक वैद्यांकडे गेलो. मी केलेला नामजप आणि त्या आधुनिक वैद्यांनी केलेले उपचार यांमुळे माझी जखम आता ९० टक्के बरी झाली आहे. मी आता स्वतः जखमेवर ‘ड्रेसिंग’ (मलमपट्टी) करतो. सद्गुरु अनुताईंनी सांगितलेल्या नामजपामुळे माझ्या वेदना न्यून होऊन माझी जखमही बरी होत आली आहे. त्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. पांडुरंग दुदुमकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८२ वर्षे), अंधेरी, मुंबई. (७.१२.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक