छत्तीसगडमध्ये ८ वर्षीय हिंदु मुलाचे त्याच्या मुसलमान आजीकडून धर्मांतर !

हिंदु युवतीने मुसलमानाशी विवाह केल्यावर बहुतांश वेळा तिचे धर्मांतर केले जाते, त्यासह मुसलमान मुलीने हिंदु युवकाशी विवाह केल्यावर त्यांच्या येणार्‍या पिढ्यांचे धर्मांतर करण्याचा कट मुलीचे कुटुंबीय रचतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

जशपूर – येथील सन्ना येथील चित्तरंजन सोनवानी यांचा ८ वर्षीय मुलगा सौरभ सोनवानी याचे त्याची मुसलमान आजी (आईची आई) हिने धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. ‘मुलाला जत्रेला घेऊन जात आहे’, असे खोटे सांगून या मुसलमान महिलेने सौरभ याचे धर्मांतर करून त्याचे शमशाद असे नामकरण केले. या प्रकरणी मुलाचे वडील चित्तरंजन सोनवानी यांनी ‘मला अंधारात ठेवून मुलाचे धर्मांतर केले’, असे सांगत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

सोनवानी यांनी १० वर्षांपूर्वी रेश्मा बेगम नामक युवतीशी हिंदु पद्धतीनुसार विवाह केला. त्यानंतर बर्‍याच वेळा रेश्मा हिच्या माहेरच्या लोकांकडून सोनवानी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला, तसेच विविध प्रलोभने दाखवण्यात आली; मात्र सोनवानी यांनी त्यास नकार दिला. ‘मागील वर्षी नोव्हेंबर मासात रेश्मा माहेरी गेली होती. त्या वेळी माझ्या सासूने रेश्मा हिच्याशी हातमिळवणी करून सौरभ याचे धर्मांतर केले. याविषयी आता कळवल्यावर तक्रार प्रविष्ट केली’, असे सोनवानी यांनी म्हटले आहे.