श्रीनगरमध्ये ३ आतंकवादी ठार

३ पोलीस आणि १ सैनिक घायाळ

आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार, हे लक्षात घ्या ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – श्रीनगरच्या बाहेर पंथाचौक भागात सुरक्षादलांनी एका चकमकीत ३ आतंकवाद्यांना ठार केले आहे. या चकमकीत जम्मू-काश्मीर पोलीस दलातील ३ पोलीस, तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा १ सैनिक असे एकूण ४ जण घायाळ झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत ९ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.