ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

प्रेमभाव, आध्यात्मिक प्रगल्भता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (वय १० वर्षे) !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास रवींद्र देशपांडे (वय १० वर्षे) याच्याविषयी त्याची आजी श्रीमती मेघना वाघमारे (श्रीनिवासच्या आईची आई) यांना श्रीनिवासशी केलेल्या संभाषणातून लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. श्रीनिवास देशपांडे

१. श्रीनिवासने ‘यवतमाळ येथील माझे घर तुझेच घर आहे’, असे आजीला सांगणे

‘श्रीनिवास रामनाथी आश्रमात निवासाला आल्यानंतर जवळजवळ एक मासाने माझ्या खोलीत रहायला आला. तो खोलीत असतांना काही कारणाने मी माझे साहित्य असलेले कपाट उघडले. त्यातील साहित्य पाहून त्याचे माझ्याशी झालेले संभाषण येथे दिले आहे.

कु. श्रीनिवास : आजी, तुझ्याकडे एवढे साहित्य आहे ?

श्रीमती मेघना वाघमारे

श्रीमती मेघना वाघमारे (आजी)(मी त्याला गंमतीने म्हटले.) : अरे, एवढेसेच आहे आणि सगळे इथेच आहे. आजीला घर कुठे आहे ? गुरूंचे घर हेच आजीचे घर आहे.

कु. श्रीनिवास (सहजतेने) : अगं, यवतमाळला आहे ना आपले घर ! माझे घर तुझेच घर आहे.

(त्या वेळी मला श्रीनिवासमधील प्रेमभावाची जाणीव झाली.)

२. श्रीनिवासने आजीला ‘आपल्याला एवढे मोठे परात्पर गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) भेटले असल्याने आपण गरीब नसून श्रीमंत आहोत’, असे सांगणे

एकदा मी खोलीत माझ्या साड्यांना इस्त्री करत होते. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

कु. श्रीनिवास : आजी, तुझ्याजवळ इस्त्रीसुद्धा आहे का ? तुझी आहे ना ?

श्रीमती मेघना वाघमारे (आजी) : नाही रे बाळा, आश्रमातील इस्त्री आहे. तुझ्या आजीचे असे काही नाही. (त्यावर तो गप्प बसला.) (मी त्याला गंमतीने म्हणाले) अरे, तुझी आजी गरीब आहे.

कु. श्रीनिवास (दोन क्षण थांबून) : अगं आजी, समाजातील लोक गरीब आहेत. आपण गरीब कसे ? आपण तर पुष्कळ श्रीमंत आहोत.

श्रीमती मेघना वाघमारे (आजी) : ते कसे काय ?

कु. श्रीनिवास : आपल्याला एवढे मोठे परात्पर गुरु डॉक्टर भेटले आहेत. मग आपण श्रीमंतच नाही का ?

तेव्हा श्रीनिवासमधील ‘आध्यात्मिक प्रगल्भता आणि परात्पर गुरुदेवांप्रतीचा भाव’ या गुणांचे मला कौतुक वाटले.’

– श्रीमती मेघना वाघमारे (आजी (श्रीनिवासच्या आईची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०२१)


दैवी बालकांना इंग्रजी माध्यमाच्या किंवा ‘कॉन्व्हेंट’ शाळांमध्ये न घालता त्यांना संतांनी चालवलेल्या गुरुकुलात पाठवल्यास त्यांच्यातील दिव्यत्व वाढेल !

पू. तनुजा ठाकूर

१. एका साधकाच्या घरी दैवी बालक असल्याचे समजणे, त्याला ‘दत्त आणि श्रीकृष्ण’ यांचा नामजप करायला सांगितल्यावर त्याने नियमित नामजप करणे

‘वर्ष २००८ मध्ये मी आमच्या गावाला रहात असतांना ‘एका साधकाच्या घरी एक दैवी बालक आहे’, असे मला समजले. तो उच्च स्वर्गलोकातील दैवी बालक आहे आणि तो नियमित नामजपही करत असे. त्याने वयाच्या तिसर्‍या वर्षी ‘अ, आ, इ’ ने विद्यारंभ न करता ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ लिहिण्यास आरंभ केला होता. तो ४ वर्षांचा असतांना मी त्याला एक घंटा दत्ताचा नामजप आणि इतर वेळी ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ हा नामजप करायला सांगितला होता. त्या वेळी मी त्याला विचारले, ‘‘तुला कोणता नामजप करायला सांगितला आहे, हे समजले का ?’’ तेव्हा त्याने पटकन हे दोन नामजप सांगितले. ते ऐकून तेथील सर्वांना आश्चर्य वाटले.

२. बालकाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत न घालता हिंदी शाळेत घालण्यास सांगणे; परंतु वडिलांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातल्याने आता त्याच्यावर पुष्कळ त्रासदायक शक्तीचे आवरण येणे

मी त्याच्या वडिलांना सांगितले, ‘‘याला ख्रिस्त्यांनी चालवलेल्या इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकवण्यापेक्षा हिंदी भाषिक शाळेत शिकण्यासाठी पाठवा.’’ त्याच्या वडिलांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी त्या मुलाला तेथील प्रसिद्ध ख्रिस्ती मिशनरींच्या ‘कॉन्व्हेंट’मध्ये घातले. पुढे तो बालक ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगातही सहभागी होईनासा झाला. आता तो बालक
१६ वर्षांचा झाला आहे; परंतु त्याच्यावर पुष्कळ त्रासदायक आवरण आले आहे. काही मासांपूर्वी मी त्यांच्या घरी गेले होते. वाईट शक्तींनी त्याच्यावर आणलेले त्रासदायक शक्तीचे आवरण पाहून मला पुष्कळ वाईट वाटले.

३. मेकॉलेच्या तमोगुणी शिक्षणपद्धतीमुळे मुलांवर आवरण येत असल्याने, त्यांना गुरुकुलात पाठवल्यास त्यांच्यातील दिव्यत्व वाढून पालकांचेही कल्याण होईल !

‘मेकॉलेच्या तमोगुणी शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर आवरण येते. अशा दैवी बालकांना आपण ख्रिश्चन मिशनरींच्या शाळेत घातले, तर त्यांच्यावर अधिक प्रमाणात तमोगुणाचे आवरण येईल. आपल्या घरी दैवी बालके असतील, तर त्यांना संतांनी चालवलेल्या कोणत्याही गुरुकुलात पाठवा. त्यामुळे त्यांच्यातील दिव्यत्व अजून वाढेल आणि पालकांचेही कल्याण होईल !’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ. (३०.१०.२०२१)


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.